Punjab Election Counting:’कोहली’ने घेतली ‘कॅप्टन’ची विकेट, पंजाब काँग्रेसच्या हातातून निसटलं

मुंबई तक

• 07:28 AM • 10 Mar 2022

काँग्रेस विधानसभा निवडणुक मतमोजणीत आणखी एका धक्कादायक निकालाची नोंद झाली आहे. काँग्रेसने मुख्यमंत्रीपदावरुन उचलबांगडी केल्यानंतर भाजपच्या साथीने वेगळी पंजाब लोक काँग्रेसची मोट बांधणारे कॅप्टन अमरिंदर यांना पराभवाचा धक्का बसला आहे. पंजाबच्या पटीयाला विधानसभा मतदारसंघात आद आदमी पक्षाच्या अजितपाल सिंग कोहली यांनी मोठी आघाडी घेतली आहे. एक्झिट पोलच्या आकडेवारीत पंजाबला सत्ता मिळणार असे संकेत मिळत होते. […]

Mumbaitak
follow google news

काँग्रेस विधानसभा निवडणुक मतमोजणीत आणखी एका धक्कादायक निकालाची नोंद झाली आहे. काँग्रेसने मुख्यमंत्रीपदावरुन उचलबांगडी केल्यानंतर भाजपच्या साथीने वेगळी पंजाब लोक काँग्रेसची मोट बांधणारे कॅप्टन अमरिंदर यांना पराभवाचा धक्का बसला आहे. पंजाबच्या पटीयाला विधानसभा मतदारसंघात आद आदमी पक्षाच्या अजितपाल सिंग कोहली यांनी मोठी आघाडी घेतली आहे.

हे वाचलं का?

एक्झिट पोलच्या आकडेवारीत पंजाबला सत्ता मिळणार असे संकेत मिळत होते. प्रत्यक्ष मतमोजणीचा कौलही असाच आलेला आहे. बहुमतासाठी लागणारा आकडा पार करत आद आदमी पक्षाने पंजाबवर आपली सत्ता जवळपास निश्चीत केली आहे. काही महिन्यांपूर्वी सत्तेत असलेल्या काँग्रेसचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला आहे.

आम्ही देशभरात काँग्रेसची जागा घेणार, पंजाबमधील यशानंतर ‘आप’चा आत्मविश्वास दुणावला

नवज्योतसिंह सिद्धुसोबत झालेल्या वादानंतर कॅप्टन अमरिंदर यांनी भाजपच्या पाठींब्यावर पंजाब लोक काँग्रेसची स्थापना केली. परंतू आम आदमी पक्षाच्या झंजावातासमोर कॅप्टन यांचा जराही निभाव लागला नाहीये. अजितपालसिंह कोहली यांनी मतमोजणीत मोठी आघाडी घेत कॅप्टन यांना बॅकफूटला ढकललं. काँग्रेस, अकाली दल आणि मतदारसंघातील इतर अपक्ष उमेदवारांमुळे पटीयाला विधानसभा मतदारच्या संघाच्या निकालावर परिणाम झालेला दिसतोय.

Punjab Election Counting: ‘आप’चा विद्यामान मुख्यमंत्रांना डबल शॉक; चन्नी आजच राजीनामा देणार?

    follow whatsapp