पंजाबच्या लुधियाना शहरात आपल्या लिव्ह इन जोडीदाराच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आरोपी फरार असून पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला आहे.
ADVERTISEMENT
लुधियाना शहरातील मोती नगर पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या आईने या प्रकाराबद्दल तक्रार दाखल केली आहे. या आरोपीचं नाव विशाल कुमार असं असून तो शेरपूरचा रहिवासी असल्याचं वृत्त हिंदुस्थान टाइम्सने दिलं आहे. पीडित मुलीची आई ही कामगार आहे, तिने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी हा प्रकार घडला.
मुलीने घडलेल्या प्रकाराबद्दल माहिती दिल्यानंतर महिलेने आपल्या साथीदाराला याबद्दल जाब विचारला असता त्याने तिला शिवीगाळ करत घटनास्थळावरुन पळ काढला. ज्यानंतर तिने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. दोन वर्षांपूर्वी या महिलेची आणि आरोपीची ओळख झाली. ज्यानंतर त्यांनी लिव्ह-इनमध्ये रहायला सुरुवात केली.
या घटनेतील आरोपी हा चालक म्हणून काम करतो, परंतू गेले अनेक महिने तो बेरोजगार आहे. मोती नगर पोलिसांनी या प्रकरणात आरोपीविरुद्ध POSCO कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरु आहे.
चार महिन्यांच्या बाळाची वडिलांकडून चार लाखांना विक्री, मुंबई पोलिसांनी केली सुटका, 11 जण अटकेत
ADVERTISEMENT