मला अपमानित झाल्यासारखं वाटलं; कॅप्टन अमरिंदर सिंहांनी व्यक्त केली खदखद

मुंबई तक

• 12:17 PM • 18 Sep 2021

गेल्या काही महिन्यांपासून पंजाब काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत संघर्ष मुख्यमंत्र्यांच्या राजीनामापर्यंत पोहोचला. कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी आज मुख्यमंत्री पदासह संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला. त्यानंतर त्यांनी पक्षश्रेष्ठीबद्दलची खदखद बोलून दाखवली. काँग्रेसमधील विकोपाला गेलेल्या संघर्षानंतर आज कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी पंजाबच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. सकाळी काँग्रेसच्या हंगामी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी सिंह यांनी चर्चा […]

Mumbaitak
follow google news

गेल्या काही महिन्यांपासून पंजाब काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत संघर्ष मुख्यमंत्र्यांच्या राजीनामापर्यंत पोहोचला. कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी आज मुख्यमंत्री पदासह संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला. त्यानंतर त्यांनी पक्षश्रेष्ठीबद्दलची खदखद बोलून दाखवली.

हे वाचलं का?

काँग्रेसमधील विकोपाला गेलेल्या संघर्षानंतर आज कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी पंजाबच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. सकाळी काँग्रेसच्या हंगामी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी सिंह यांनी चर्चा केली. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता राजभवनात राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला.

राजीनामा दिल्यानंतर त्यांनी पक्षश्रेष्ठीबद्दलची नाराजी बोलून दाखवली. आपल्या अपमानित केलं जात असल्यासारखं वाटतं होतं. त्यामुळे आपण हा निर्णय सोनिया गांधी यांना कळवला. आता त्यांनी ज्याच्यावर विश्वास आहे, त्याला मुख्यमंत्री बनवावं’, असंही कॅप्टन अमरिंदर सिंह म्हणाले.

Amarinder Singh: पंजाबमध्ये मोठी उलथापालथ, कॅप्टन अमरिंदर सिंहांनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

कॅप्टन अमरिंदर सिंह माध्यमांशी बोलताना काय म्हणाले?

‘मी आज राजीनामा देत असल्याचं काँग्रेसध्यक्षांना सांगितलं. मी सरकार चालवू शकत नाही. याबद्दल त्यांच्या मनात शंका असावी. पण मला अपमानित झाल्यासारखं वाटलं. ज्याच्यावर त्यांचा विश्वास आहे, त्याला त्यांनी मुख्यमंत्री बनवावं’, असं माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह म्हणाले.

‘मी काँग्रेसमध्येच आहे. माझ्या समर्थकांशी चर्चा करेल आमि नंतर भविष्यातील वाटचालीबद्दल निर्णय घेईन’, असंही अमरिंदर सिंह यांनी म्हटलं आहे. माझ्या परस्पर आमदारांच्या बैठका घेतल्या गेल्या. आता हे तिसऱ्यांदा होत आहे. त्यामुळे मला अपमानित झाल्यासारखं वाटलं आणि सकाळीच राजीनामा देण्याचा निर्णय घेतला, असंही अमरिंदर सिंह यांनी राजीनामा दिल्यानंतर सांगितलं.

पंजाब काँग्रेसमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंह विरुद्ध नवज्योत सिंह सिद्धू असा असा संघर्ष गेल्या काही महिन्यांपासून सुरू होता. सिद्धू यांची पक्षाच्या प्रदेशाध्यपदी नियुक्ती केल्यानंतर हा संघर्ष आणखी उफाळून आला होता. त्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या राजीनाम्याने यावर पडदा टाकला असला, तरी धग मात्र कायम असल्याचं चित्र आहे.

    follow whatsapp