राहुल गांधी यांचं फडणवीस-शेवाळे यांना प्रत्युत्तर : वीर सावरकर यांचं ‘ते’ पत्र आणलं समोर

मुंबई तक

• 08:45 AM • 17 Nov 2022

अकोला : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या दरम्यान केलेल्या एका भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली. सावरकर हे कसे माफीवीर होते, इंग्रजांकडून भत्ता घेत होते हे आपल्या भाषणात सांगितलं. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलं आहे. भाजप-बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून राहुल गांधींविरोधात टीका करण्यात येत आहे. तसंच त्यांच्याविरोधात जोडो मारो […]

Mumbaitak
follow google news

अकोला : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या दरम्यान केलेल्या एका भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली. सावरकर हे कसे माफीवीर होते, इंग्रजांकडून भत्ता घेत होते हे आपल्या भाषणात सांगितलं. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलं आहे. भाजप-बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून राहुल गांधींविरोधात टीका करण्यात येत आहे. तसंच त्यांच्याविरोधात जोडो मारो आंदोलन करण्यात येत आहे. इतकंच नाही तर खासदार राहुल शेवाळे यांनी भारत जोडो यात्रा थांबविण्याचीही मागणी केली.

हे वाचलं का?

याच सगळ्या वादावर गुरुवारी राहुल गांधी यांनी देवेंद्र फडणवीस-शेवाळे यांना उत्तर दिलं. ते अकोला येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी सावरकर यांनी 30 मार्च 1920 रोजी इंग्रजांना लिहिलेलं एक पत्र दाखवून त्यातील शेवटची ओळ वाचून दाखविली. यात I beg to remain sir, your most obedient servant अशी ही ओळ होती.

या ओळीचा हिंदी अर्थ “सर मै आपका नोकर रहना चाहता हुँ!” असा होत असल्याचही त्यांनी सांगितलं. त्यामुळे सावरकर यांनी इंग्रजांची मदत केली होती हे मी स्पष्टपणे सांगू शकतो. हे पत्र फडणवीस यांना पाहायचं असेल तरी ते बघू शकतात, असंही राहुल गांधी म्हणाले.

तर खासदार शेवाळे यांच्या भारत जोडो यात्रा थांबवण्याच्या मागणीवर उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले, थांबवा. काहीच अडचण नाही. जर कोणाचा काही विचार असेल तर त्याचा आदर करायला हवा. जर सरकारला वाटलं की भारत जोडो यात्रा थांबवायला हवं, तर थांबवा, प्रयत्न करा, असं आव्हान त्यांनी दिलं.

वीर सावरकर यांच्याबाबत काय म्हणाले होते राहुल गांधी?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ इंग्रजांना मदत करत होता, तर सावरकरांना इंग्रजांकडून भत्ता मिळत होता. हे एतिहासिक तथ्य आहे की, स्वातंत्र्याच्या लढाईत हे कुठेही दिसले नाहीत. हे सत्य भाजपच्या नेत्यांनी मान्य करावं. काँग्रेस पक्षातील नेत्यांनी स्वातंत्र्याच्या लढाईत इंग्रजांविरोधात लढा दिला. अनेक वर्ष त्यांना तुरुंगात राहावं लागलं.

महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरु, वल्लभभाई पटेल यांच्यासह अनेक नेत्यांनी इंग्रजांविरोधात लढा दिला. द्वेष पसरणारे व्यक्ती कोण आहेत आणि ते कोणत्या समाजातून आले, याचा काहीही फरक पडत नाही. द्वेष आणि हिंसा पसरवणे हे देशाविरोधी कार्य आहे. आम्ही त्या प्रत्येक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीविरोधात लढणार आहोत. हे वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं होतं. आज देवेंद्र फडणवीस यांनी या टीकेला उत्तर दिलं आहे.

    follow whatsapp