राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिल्या शुभेच्छा; म्हणाले…

मुंबई तक

• 04:12 AM • 17 Sep 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आज साजरा होत आहे. यानिमित्ताने विविध क्षेत्रातील व्यक्तींकडून नरेंद्र मोदी यांचं अभिष्टचिंतन केलं जात आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७१वा वाढदिवस असून, त्यांच्या जन्मदिनी भाजपकडून देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान पंतप्रधान मोदींवर राजकीय नेत्यांसह विविध क्षेत्रांतील व्यक्तींकडून […]

Mumbaitak
follow google news

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आज साजरा होत आहे. यानिमित्ताने विविध क्षेत्रातील व्यक्तींकडून नरेंद्र मोदी यांचं अभिष्टचिंतन केलं जात आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.

हे वाचलं का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७१वा वाढदिवस असून, त्यांच्या जन्मदिनी भाजपकडून देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान पंतप्रधान मोदींवर राजकीय नेत्यांसह विविध क्षेत्रांतील व्यक्तींकडून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही ट्वीट करत पंतप्रधान मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. राहुल गांधी एका ओळीतच पंतप्रधानांचं अभिष्टचिंतन केलं आहे. ‘मोदीजी, वाढदिवसाच्या शुभेच्छा’ अशा शब्दात राहुल गांधी यांनी मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही अभिष्टचिंतन केलं आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्याला आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो आणि आपल्या हातून राष्ट्राची सेवा घडावी’, अशा सदिच्छा राष्ट्रपतींनी व्यक्त केल्या आहेत.

अमित शाहांनी केलं अभिष्टचिंतन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही पंतप्रधान मोदी यांना ७१व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अमित शाह यांनी एक ट्वीट केलं आहे. ज्यात म्हटलं आहे की, ‘देशातील सर्वांना प्रिय असलेले नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. आपल्याला चांगलं आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळो, अशी ईश्वराकडे प्रार्थना करतो. मोदीजीनी देशाला केवळ भविष्याचा वेध घेण्याचाच नाही, तर परिश्रमाच्या बळावर उद्दिष्ट साध्य करण्याचा विचार तर दिलाच, पण तो सार्थही ठरवला’, असं शाह यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp