Raigad Landslide : रायगडमधील मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना मोदी सरकारकडून मदत जाहीर

मुंबई तक

• 12:26 PM • 23 Jul 2021

महाराष्ट्रात पावसाने कहर माजवला आहे. कोकणाला याचा सर्वात जास्त फटका बसला आहे. त्यामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. तळये गावात दरड कोसळून 38 जणांचा मृत्यू झाला. या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. तसंच पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख आणि जखमींना प्रत्येकी 50 हजारांची मदत जाहीर करण्यात आली […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्रात पावसाने कहर माजवला आहे. कोकणाला याचा सर्वात जास्त फटका बसला आहे. त्यामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. तळये गावात दरड कोसळून 38 जणांचा मृत्यू झाला. या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. तसंच पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख आणि जखमींना प्रत्येकी 50 हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून या घटनेबाबत दुःख व्यक्त करण्यात आलं आहे. काही वर्षांपूर्वी घडलेल्या माळीण दुर्घटनेची आठवण करून देणारी ही दुःखद घटना महाराष्ट्रात घडली आहे.

हे वाचलं का?

काय घडलं तळये गावात?

महाडमधील बिरवाडीपासून 14 किमीपासून तळये गावाजवळ गुरुवारी संध्याकाळी 5 ते 6 वाजेच्या सुमारास अचानक दरड कोसळून तब्बल 30 हून अधिक घरं ही ढिगाऱ्याखाली गाडली गेल्याचं समजतं आहे. दरम्यान, अद्यापपर्यंत यात काही जीवितहानी झाली आहे की नाही याची माहिती मिळू शकलेली नव्हती. आता मात्र या ठिकाणी बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. NDRF ची टीम या ठिकाणी बचावकार्य करते आहे. या टीमने आत्तापर्यंत 38 मृतदेह बाहेर काढले आहेत.

दुसरीकडे महाड आणि परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस बरसत असल्याने बिरवाडी आणि दुर्घटनाग्रस्त भागाशी संपूर्णपणे संपर्क तुटला आहे. ही दुर्घटना होऊन आता अनेक तास उलटले आहेत. मात्र, मुसळधार पावसामुळे अद्यापही दुर्घटनास्थळी बचाव कार्य करणाऱ्या टीम पोहचू शकलेल्या नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार NDRF च्या काही तुकड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत.

कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्र तसेच राज्यात ठिकठिकाणी अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयातील नियंत्रण कक्षास भेट देऊन आढावा घेतला तसेच बचाव मदत कार्याबाबत प्रशासनास सूचना दिल्या. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील दरड कोसळण्याच्या झालेल्या दोन दुर्घटनेतील मृतांबाबत शोक व्यक्त करून अशा प्रकारे डोंगर उतारांवरील गावे आणि वस्त्या येथील रहिवाशांनी प्रशासनास स्थलांतर करण्यासाठी योग्य ते सहकार्य करावे असेही आवाहन त्यांनी केले.

    follow whatsapp