राज कुंद्रा पॉर्न फिल्म प्रकरणात 1500 पानांचं आरोपपत्र मुंबई पोलिसांनी दाखल केलं आहे. या प्रकरणी एकूण 58 साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या आहेत. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने हे आरोपपत्र दाखल केलं आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याच्यासह चार जणांविरोधात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बुधवारी आरोपपत्र दाखल केलं आहे. या आरोपपत्रात पीडित मुलींचा लैंगिक छळ करणे, त्यांची फसवणूक करणं तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलमांनुसार पोलिसांनी आरोप लावले आहेत. प्रामुख्यानं सध्या राज कुंद्रासह अटकेत असलेला त्याचा कर्मचारी रायन थॉर्पवर पोलिसांनी हे आरोप दाखल केले आहेत.
ADVERTISEMENT
पॉर्न चित्रफीत निर्माण करून त्याच्या प्रसारणासाठी कुंद्राने 2019 मध्ये आर्म्स प्राईम मीडिया नावाने कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या माध्यमातून पॉर्न चित्रफीती प्रसारणासाठी तयार करण्यात आलेले हॉटशॉट्स नावाचे अॅप्लिकेशन लंडनस्थित केनरीन कंपनीला विकले. पण या अॅप्लिकेशनबाबतची बरीच कामे कुंद्रामार्फतच चालू होती. या अॅप्लिकेशन निर्मितीसाठी राज कुंद्राने पैशांची गुंतवणूक केली होती.
राज कुंद्रा हा पॉर्नोग्राफी प्रकरणात मुख्य सूत्रधार असल्याचे पुरावे गुन्हे शाखेला मिळाले आहेत. कुंद्रासह मालमत्ता कक्षाने कारवाई करून या अश्लील अॅप्लिकेशनच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचा प्रमुख रायन जॉन मायकल थॉर्प यालाही अटक केली होती. त्याचाविरोधातही गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. अतिरिक्त मुख्य दंडाधिकारी ३७ वे न्यायालय यांच्याकडे हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
राज कुंद्राविरोधात सायबर गुन्हे शाखेनं गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात पोर्नोग्राफीच्या पहिल्या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये ‘आर्मप्राईम मीडिया प्राईव्हेट लिमिटेड’ नामक कंपनीकडून आपल्याशी संपर्क साधला गेला होता. त्या अॅपमार्फत नवोदित प्रतिभावंत कलाकारांना त्यांचा अभिनय डिजिटल माध्यमातून दाखवण्याची संधी देण्यात येणार होती. त्यांची संकल्पना आवडली आणि व्यवसायिक म्हणून आपण त्यात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतल्याचं कुंद्रानं आपल्या याचिकेत म्हटलेलं आहे. त्यानुसार फेब्रुवारी ते डिसेंबर 2019 दरम्यान संबंधित कंपनीशी करार करण्यात आला होता. त्यादरम्यान आपला चित्रपट निर्मितीमध्ये जराही सक्रिय सहभाग नव्हता. तसेच हॉटशॉट्स अॅपमधील पोर्नोग्राफीशीही आपला काहीही संबंध नसून आपल्यावरील आरोप हे खोटे असून आपल्याला यात गोवण्यात आल्याचा दावाही राज कुंद्रानं कोर्टापुढे केला आहे.
राज कुंद्राला अटक करण्याआधी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Crime Branch) पॉर्न फिल्म प्रकरणात खोलवर तपास केला. ज्यावेळी राज कुंद्राचा साथीदार उमेश कामतला अटक झाली तेव्हा पोलिसांच्या हाती महत्त्वाचे पुरावे लागले. या पुराव्यांच्या आधारेच एप्रिल महिन्यात चार्जशीट फाईल करण्यात आली. या चार्जशीटमध्ये पॉर्न फिल्म व्हीडिओजच्या माध्यमातून तीन वर्षांमध्ये किती कमाई होणार याची माहिती समोर आली आहे. या चार्जशीटची एक कॉपी इंडिया टुडेच्या हाती लागली आहे. जाणून घ्या ग्रॉस रेव्हेन्यू आणि प्रॉफिट बद्दल
वर्ष 2021-22
ग्रॉस रेव्हेन्यू – 36.50 कोटी
प्रॉफिट 4,76, 85000 कोटी
वर्ष 2022-23
ग्रॉस रेव्हेन्यू- 73 कोटी
प्रॉफिट 4,76, 85000 कोटी
वर्ष 2023-24
ग्रॉस रेव्हेन्यू – 1.46 अब्ज
प्रॉफिट- 30, 42, 1, 400 कोटी
Raj Kundra : कंडक्टरचा मुलगा, हिरे व्यापारी, शिल्पा शेट्टीशी लग्न ते पॉर्न प्रकरण; जाणून घ्या खास गोष्टी
काय होता राज कुंद्राचा प्लान बी?
राज कुंद्राच्या What’s App चॅटमधूनही काही गोष्टी समोर आल्या आहेत. यामध्ये सगळ्यात खास आहे तो बॉलिफेम App चा उल्लेख. जेव्हा गुगल आणि अॅपल या दोघांनीही HotShot हे अॅप हटवलं तेव्हा राज कुंद्रा बॉलिफेम App आणणार होता. हा त्याचा प्लान बी होता. फेब्रुवारी 2021 मध्ये जेव्हा पॉर्नोग्राफी रॅकेटचं पितळ उघडं पडलं तेव्हा राज कुंद्राने प्लान बी अॅक्टिव्हेट केला. त्यानंतर त्याने त्याचा फोनही बदलला. मुंबई पोलिसांनी जेव्हा राज कुंद्राकडे त्याचा जुना मोबाईल मागितला तेव्हा राज कुंद्राने सांगितलं की हा नवा फोनच माझ्याकडे आहे जुना फोन नाही. पोलिसांसाठी राज कुंद्राचा जुना फोन मिळणं आवश्यक आहे कारण पॉर्न रॅकेट कसं चालत होतं त्याचे सगळे डिटेल्स त्या फोनमध्ये असतील असा विश्वास मुंबई पोलिसांना आहे.
ADVERTISEMENT