Pornography Case : शिल्पा शेट्टीने पोलिसांना सांगितलं ‘राज काय करतो ते मला….’

मुंबई तक

• 09:34 AM • 16 Sep 2021

मी कामात प्रचंड व्यस्त असते त्यामुळे राज काय करतो ते मला माहित नाही असा जबाब अभिनेत्री शिल्पा शेट्टीने पोलिसांकडे नोंदवला आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पॉर्न प्रकरणात आज राज कुंद्रा विरोधात 1500 पानांचं आरोपपत्र दाखल केलं. त्यामध्ये 58 साक्षीदारांच्या साक्षींची नोंद आहे. यामध्ये शिल्पा शेट्टीचा म्हणजेच राज कुंद्राच्या पत्नीचाही जबाब आहे. काय म्हटलं आहे शिल्पा […]

Mumbaitak
follow google news

मी कामात प्रचंड व्यस्त असते त्यामुळे राज काय करतो ते मला माहित नाही असा जबाब अभिनेत्री शिल्पा शेट्टीने पोलिसांकडे नोंदवला आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पॉर्न प्रकरणात आज राज कुंद्रा विरोधात 1500 पानांचं आरोपपत्र दाखल केलं. त्यामध्ये 58 साक्षीदारांच्या साक्षींची नोंद आहे. यामध्ये शिल्पा शेट्टीचा म्हणजेच राज कुंद्राच्या पत्नीचाही जबाब आहे.

हे वाचलं का?

काय म्हटलं आहे शिल्पा शेट्टीने?

राजने 2015 मध्ये विआन इंडस्ट्रीज लि. नावाची कंपनी सुरू केली. या कंपनीत त्याचे 24.50 टक्के शेअर्स आहेत. सदर कंपनीमध्ये एप्रिल 2015 ते जुलै 2020 या कालावधीत मी संचालक पदावर होते. मात्र नंतर मी या पदाचा राजीनामा दिला. हॉटशॉट अॅप आणि बॉलीफेम या संदर्भात मला काहीही माहित नाही. मी माझ्या कामात व्यस्त असल्याने पती राज कुंद्रा नेमकं काय करत होता हे माहित नाही असं शिल्पा शेट्टीने सांगितलं आहे.

शिल्पा शेट्टीने HotShot बाबत काय म्हटलं होतं?

शिल्पा शेट्टी म्हणते, ‘HotShot या अॅपवर येणारे चित्रपट अश्लील नसून इरॉटिक चित्रपट आहेत. यापेक्षा जास्त अश्लील चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहण्यास मिळतात. पण माझा याच्याशी काहीही संबंध नाही. हॉटशॉटबाबत मला काहीही माहित नाही’ असं उत्तर शिल्पाने दिलं होतं. असं असलं तरीही मला हॉटशॉटशी काहीही घेणंदेणं नाही असं तिने आता म्हटलं आहे. तसंच राज हा अश्लील चित्रपट बनवण्यात सहभागी नव्हता असंही शिल्पा शेट्टीने म्हटलं होतं. एवढंच नाही तर मला काहीही माहित नाही असंही उत्तर शिल्पा शेट्टीने जुलै महिन्यात दिलं होतं.

Shilpa Shetty म्हणते आम्हाला मीडिया ट्रायलची गरज नाही, प्रसिद्ध केलं निवेदन

पॉर्न फिल्म प्रकरणात राज कुंद्राला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. राज कुंद्राविरोधात सायबर गुन्हे शाखेनं मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात पोर्नोग्राफीच्या पहिल्या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये ‘आर्मप्राईम मीडिया प्राईव्हेट लिमिटेड’ नामक कंपनीकडून आपल्याशी संपर्क साधला गेला होता. त्या अॅपमार्फत नवोदित प्रतिभावंत कलाकारांना त्यांचा अभिनय डिजिटल माध्यमातून दाखवण्याची संधी देण्यात येणार होती.

त्यांची संकल्पना आवडली आणि व्यवसायिक म्हणून आपण त्यात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतल्याचं कुंद्रानं आपल्या याचिकेत म्हटलेलं आहे. त्यानुसार फेब्रुवारी ते डिसेंबर 2019 दरम्यान संबंधित कंपनीशी करार करण्यात आला होता. त्यादरम्यान आपला चित्रपट निर्मितीमध्ये जराही सक्रिय सहभाग नव्हता. तसेच हॉटशॉट्स अॅपमधील पोर्नोग्राफीशीही आपला काहीही संबंध नसून आपल्यावरील आरोप हे खोटे असून आपल्याला यात गोवण्यात आल्याचा दावाही राज कुंद्रानं कोर्टापुढे केला आहे.

    follow whatsapp