औरंगाबाद: औरंगाबादमधील जाहीर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट मुंबई Tak ने घेतलेली जेम्स लेनची मुलाखत दाखवत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे.
ADVERTISEMENT
पाहा राज ठाकरेंनी मुंबई Tak ने घेतलेली मुलाखत दाखवत शरद पवारांवर काय टीका केली:
‘आता जेम्स लेन… इतकी वर्ष ही माणसं सत्तेत होती.. खेचून आणायचा होता त्या जेम्स लेनला. विचारायचं होतं तुला कोणी सांगितलं हे. त्या जेम्स लेनची आता ‘इंडिया टुडे’ने मुलाखत घेतली. त्या मुलाखतीमधील फक्त चार प्रश्न मी तुम्हाला दाखवायला आणले आहे.. ते चार प्रश्न फक्त आपण बघून घ्या.’
जेम्स लेनच्या मुलाखतीतील हा काही भाग आहे हा.
प्रश्न: छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची अवमानकारक माहिती कोणी पुरवली होती?
उत्तर (जेम्स लेन): तुम्ही प्रश्न चुकीच्या पद्धतीने विचारत आहात. मला कोणीही माहिती पुरवली नाही. माझं पुस्तक लोकांमध्ये प्रचलित असलेल्या कथांबद्दल आहे. या कथा सांगत असलेल्या लोकांनी काय Narrative सेट करून ठेवलंय त्याबद्दल आहे. काही लोक रामदास यांना शिवाजी महाराजांचे गुरु मानतात, तर काही तुकाराम महाराज यांना शिवाजी महाराजांचे गुरु मानतात. यातलं काय खरं आहे, त्यात मला काहीही रस नाही. पण एक गट पहिल्या Narrative च्या बाजूने आहे तर दुसरा दुसऱ्या narrative च्या बाजूने. असं का?
प्रश्न: तुमच्याकडे असलेल्या अवमानकारक माहितीचा आधार काय?
उत्तर (जेम्स लेन): माझं पुस्तक काळजीपूर्वक वाचणाऱ्याच्या लक्षात येईल की मी कुठलंही ऐतिहासिक तथ्य मांडल्याचा दावा केलेला नाही. मी शिवाजी महाराजांचा अवमान केलाय, अशी टीका करणाऱ्यांनी चुकीचा अर्थ काढलाय. पुन्हा सांगतो मी कथांबद्दल बोलतोय, इतिहासातील तथ्यांबद्दल नाही.
प्रश्न: या विषयाबाबत तुमचं बाबासाहेब पुरंदरेंशी बोलणं झालं होतं का? त्यांचं म्हणणं काय होतं?
उत्तर (जेम्स लेन): मी कधीही बाबासाहेब पुरंदरेंशी एका शब्दानेही बोललेलो नाही.
प्रश्न: महाराजांबद्दलचे अवमानकारक शब्द तुम्ही मागे घेतले. ते कशामुळे?
उत्तर (जेम्स लेन): युक्तिवाद करताना मी पुरेशी काळजी घेतली नाही आणि त्याचा परिणाम इतरांना भोगावा लागला.
‘ज्याच्यावरुन 10-15 वर्ष राजकारण केलं या महाराष्ट्रात पवार साहेब तुम्ही तो जेम्स लेन सांगतोय की, मी कोणालाही भेटलेलो नाही. ते माझं ऐतिहासिक पुस्तक नाहीए. त्यात इतिहास नाहीए. तुमची केंद्रात सत्ता होती का नाही तुम्ही त्याला फरफटत आणलात. का महाराष्ट्राची डोकी फिरवली. कशासाठी हे विष पाजलं लोकांना.. नवीन वाद उकरुन काढायचे.’
‘शिवाजी महाराजाचे गुरु रामदास स्वामी होते की नव्हते. रामदास स्वामींकडे तुम्ही पुन्हा जातीने पाहणार आहे. गुरु-शिष्याच्या नात्यांचा संबंध येतच नाही.’
शरद पवारांना हिंदू शब्दाची अॅलर्जी – औरंगाबादच्या सभेत राज ठाकरेंचा घणाघात
‘या जातीपातीच्या विषापासून दूर राहिलं पाहिजे. या पवार साहेबांना हिंदू या शब्दाचीच अॅलर्जी आहे. प्रत्येक वेळेला शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र.. हो तो आहेच. पण त्याआधी तो आमच्या शिवाजी महाराजांचा आहे.’ असं म्हणत राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
ADVERTISEMENT