एकतर्फी प्रेमातून विवाहीतेच्या पतीला मारण्यासाठी राजस्थानमध्ये शार्पशूटरला सुपारी देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. सुदैवाने या हल्ल्यात विवाहीतेचा पती सुखरुप बचावला आहे. राजस्थानमधील पोलिसांनी यानंतर तपासाची सूत्र हलवत हत्येची सुपारी देणाऱ्या डोंबिवली येथील तरुणाला अटक केली आहे.
ADVERTISEMENT
आणखी एका हत्येने हादरलं नागपूर, पुन्हा अनैतिक संबधाच्या संशयातून हत्या?
कमलेश शिंदे असं या आरोपीचं नाव असून त्याने विवाहीतेचा पती आदित्य जैनला मारण्यासाठी सुपारी दिली होती. १६ जून रोजी आदित्य जैन जयपूरमधील अवधपुरी भागातील घराजवळ आपली गाडी धुवत होते. यावेळी मोटारसायकलवरुन आलेल्या दोन अनोळखी तरुणांनी आदित्य जैन यांच्यावर गोळीबार करत तीन गोळ्या झाडल्या. आदित्य जैन यांच्या हाताला एक गोळी लागून ते जखमी झाले आहेत. दरम्यान घडलेल्या प्रकारानंतर जयपूरमधील कर्णी विहार पोलीस ठाण्याने गुन्ह्याची नोंद करत तपासाला सुरुवात केली.
तपासादरम्यान जयपूर पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. आदित्य जैन हे आपल्या पत्नी आणि परिवारासोबत २०१८ ते २०२० या काळात डोंबिवलीत राहत होते. या दरम्यान डोंबिवली भागात राहणारा मुख्य आरोपी कमलेश शिंदे हा नेहमी आदित्य जैन यांच्या दुकानात यायचा. यावेळी आदित्य यांच्या पत्नीवर कमलेशचं एकतर्फी प्रेम जमलं आणि यातून त्याने आदित्य यांच्या पत्नीला त्रास द्यायला सुरुवात केली.
बारामती : I am Sorry Mom, रक्ताने अखेरचा संदेश लिहीत पोलीस शिपायाची आत्महत्या
या त्रासाला कंटाळून जैन परिवार आपल्या मुळ गावी राजस्थानला परतला. परंतू एकतर्फी प्रेमात आंधळा झालेल्या कमलेशने राजस्थानमधील एका शार्पशूटरला आदित्य जैनला मारण्याची सुपारी दिली. दरम्यान या माहितीनंतर कर्णी विहार पोलीस ठाण्याचं पथक डोंबिवलीत दाखल झालं. यानंतर कल्याण आणि उल्हासनगर येथील गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी कमलेशला देवीचा पाडा परिसरातून ताब्यात घेतलं आहे. पुढील तपासासाठी कमलेशचा ताबा राजस्थान पोलिसांना देण्यात आला आहे.
ADVERTISEMENT