विनोदी अभिनेता राजू श्रीवास्तव सध्या जीवनाची लढाई लढत आहेत. राजू श्रीवास्तव हे मागील 11 दिवसांपासून एम्समध्ये दाखल आहेत. राजू श्रीवास्तव यांच्यावर डॉक्टरांच्या कडक देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. आता राजूच्या प्रकृतीबाबत नवी माहिती समोर आली आहे. त्याची प्रकृती नाजूक असल्याचं कळतंय. तशी माहिती एम्सच्या डॉक्टरांनी दिली आहे.
ADVERTISEMENT
एम्सच्या डॉक्टरांनी राजूच्या आरोग्याची माहिती दिली
एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत ताजी माहिती दिली आहे. राजूची प्रकृती चिंताजनक असून ते आयसीयूमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले. ही रुग्णाची आणि त्याच्या कुटुंबाची वैयक्तिक बाब आहे, त्यामुळे या प्रकरणी काहीही अधिकचे भाष्य करू इच्छित नाही, असेही ते म्हणाले.
राजुच्या भावाने दिली प्रकृतीत सुधारणेल्याची माहिती
राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक असल्याची बातमी कळताच कॉमेडियनचे सर्व चाहते हतबल झाले आहेत. वास्तविक, राजू श्रीवास्तव यांचा भाऊ दीपू श्रीवास्तव याने प्रकृतीबाबत माहिती देताना सांगितले की, राजूच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. एका वरिष्ठ महिला डॉक्टरने राजूची प्रकृती पाहिली आहे. ते म्हणाले की, जे संसर्ग विकसित झाले होते ते आता कमी होत आहेत, अशी माहिती राजू श्रीवास्तव यांच्या भावाने दिली.
देशभरातील फॅन्स करत आहेत प्रार्थना
राजूच्या तब्येतीत सुधारणा झाल्याची बातमी समोर आल्यानंतर कॉमेडियनच्या चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. मात्र आता पुन्हा राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. या बातमीने चाहत्यांचे टेन्शन पुन्हा वाढले आहे. राजू लवकर बरा व्हावा यासाठी देशभरातील फॅन्स प्रार्थना करत आहेत. राजूच्या घरच्यांनी आदल्या दिवशी त्याच्या तब्येतीसाठी पूजाही ठेवली होती.
राजू श्रीवास्तव यांची तब्येत कधी आणि कशी बिघडली?
राजू श्रीवास्तव हॉटेलच्या जिममध्ये वर्कआउट करत होते. ट्रेडमिलवर व्यायाम करत असताना त्यांना छातीत दुखू लागले आणि ते खाली पडले. यानंतर राजू श्रीवास्तव यांना त्यांच्या जिम ट्रेनरने तातडीने रुग्णालयात नेले. तेव्हापासून राजू दिल्लीच्या एम्समध्ये डॉक्टरांच्या कडक देखरेखीखाली आहेत. सर्वोत्कृष्ट डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत आहे आणि प्रत्येक क्षणी त्यांचे निरीक्षण करत आहे.
ADVERTISEMENT