राज्यसभा खासदार संभाजीराजे यांनी आज पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारला सूचक इशारा दिला आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात जशा पद्धतीने मांडायला हवा होता तसा तो मांडला गेला नाही असं म्हणत संभाजीराजेंनी आपली नाराजी बोलून दाखवली. पुण्यात आज मराठा क्रांती मोर्चाची राज्य समन्वय बैठक पार पडली. या बैठकीत खासदार संभाजीराजे बोलत होते.
ADVERTISEMENT
यावेळी बोलत असताना उपस्थित कार्यकर्त्यांनी आता मूक मोर्चा खूप झाला ठोक मोर्चा काढायला पाहिजे अशी मागणी केली. यावेळी बोलताना संभाजीराजेंनी महाराष्ट्र पेटवायला मला दोन मिनीटं लागतात पण ते करायचं नाहीये असं म्हणत कार्यकर्त्यांची समजूत काढत सरकारलाही सूचक इशारा दिला. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर संभाजीराजे महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात मुक मोर्चा काढत आहेत. यावेळी पुढचं आंदोलन हे नांदेडमध्ये होणार असल्याचंही संभाजीराजेंनी सांगितलं.
मराठा क्रांती मोर्चा करणार Neeraj Chopra चा सत्कार, राज्यस्तरीय बैठकीत ठराव पास
मुंबईच्या आझाद मैदानावर एकट्याने लाक्षणिक उपोषणाला बसण्याची माझी तयारी असल्याचंही संभाजीराजे यावेळी म्हणाले. “समाजाला न्याय मिळवून देणं हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. कोर्टात टिकेल असं आरक्ष कसं देता येईल यासाठी डोकं लावणं गरजेचं आहे. भोसले समितीने दिलेल्या १२ मुद्द्यांवर अभ्यास करण्याची गरज आहे. समाज मागास असल्याचं सिद्ध झाल्याशिवाय पुढे जाता येणार नाही.” कोणाच्या आरक्षणाला धक्का न लावता सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार असल्याचंही संभाजीराजे म्हणाले.
सारथी संस्थेसाठी हजार कोटी रुपयांची मागणी केल्यानंतरही त्याचं पुढे काहीच झालं नाही. वाड्यात जे पाहुणे येतात ते पाहुणेच असतात असं म्हणत संभाजीराजेंनी अजित पवारांनाही टोला लगावला. काही महिन्यांपूर्वी कोल्हापूर दौऱ्यावर असताना अजित पवारांनी कोल्हापूरात संभाजीराजेंच्या निवासस्थानी भेट दिली होती. कोपर्डीत अत्याचार झालेल्या भगिनीला न्याय मिळायला हवा अशीही मागणी संभाजीराजेंनी यावेळी बोलताना केली.
Maratha Reservation: मोदी सरकारचं मोठं पाऊल, दुरुस्ती विधेयकाला विरोधकांचाही पाठिंबा
ADVERTISEMENT