raksha bandhan 2022 date and time in india : भावा-बहिणीचं नातं वृद्धिंगत करणारा सण म्हणजे रक्षाबंधन! देशभरात रक्षाबंधन सण साजरा केला जातो, पण यंदा रक्षाबंधनाच्या तारखांवरून अनेकांचा गोंधळ उडाला आहे. काही जण ११ ऑगस्टला रक्षाबंधन असल्याचं सांगत आहेत, तर काही लोक १२ ऑगस्टला! त्यामुळेच रक्षाबंधनाच्या तारखेवरून संभ्रम निर्माण झाला असून, जाणून घेऊया रक्षाबंधनाची नक्की तारीख आणि वेळ कोणती…
ADVERTISEMENT
रक्षाबंधन तारीख, मुहूर्त आणि वेळ
ज्योतिषाने दिलेल्या माहितीनुसार रक्षाबंधनाचा सण गुरूवारी, ११ ऑगस्ट रोजी आहे. सांगायचं म्हणजे रक्षाबंधनाचा सण श्रावण मास शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेस साजरा करण्याची परंपरा आहे. इंग्रजी कालगणनेनुसार या वर्षी रक्षाबंधनाचा सण ११ ऑगस्ट रोजी आहे.
राखीपौर्णिमा कधी आहे?
यंदा पौर्णिमा ११ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजून ३७ मिनिटांनी सुरू होऊन १२ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजून ६ मिनिटांपर्यंत असणार आहे. त्यामुळे काही ११ ऑगस्ट ऐवजी १२ ऑगस्टला रक्षाबंधन साजरा करण्याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.
रक्षाबंधनाच्या तारखेवरून गोंधळ का निर्माण झाला आहे?
ज्योतिष अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार यावर्षी ११ ऑगस्ट रोजी पौर्णिमेच्या तिथीवर भद्राचं सावट आहे. भद्राची छाया असल्यानेच लोकांमध्ये रक्षाबंधनाच्या तारखेवरून गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळेच काही लोकांकडून १२ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरी करण्याची चुकीची माहिती पसरवली जात आहे. १२ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजून ६ मिनिटांनी पौर्णिमेचा तिथी संपून जाईल. त्यानंतर भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील प्रतिपदा तिथी सुरू होईल. त्यामुळे रक्षाबंधनाचं महत्त्व आणि मुहूर्त दोन्ही संपून जाईल.
रक्षाबंधन साजरी करण्यासाठी शुभ मुहूर्त किती काळ आहे?
रक्षाबंधन साजरी करण्यासाठी दुपारी १२ वाजेपासून ते १२ वाजून ५३ मिनिटांपर्यंत अभिजित मुहूर्त आहे. हा ५३ मिनिटांचा कालावधी राखी बांधण्यासाठी शुभ आहे.
त्यानंतर दुपारी २ वाजून ३९ मिनिटांपासून ते ३ वाजून ३२ मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त आहे.
सायंकाळी ६ वाजून ५५ मिनिटांपासून ते ८ वाजून २० मिनिटांपर्यंत अमृत काळ सुरू होईल. १ तास २५ मिनिटांच्या हा काळही राखी बांधण्यास शुभ आहे.
ADVERTISEMENT