सुशांतसिंगच्या हत्येनंतर दोनवेळा…; नारायण राणेंनी मिलिंद नार्वेकरांना दिला इशारा

मुंबई तक

• 02:39 PM • 16 Feb 2022

शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यात जुंपलेली असतानाच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर यांच्यात कलगितुरा रंगला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बॉयचं काम करणारा नेता झाला का? असं म्हटल्यानंतर मिलिंद नार्वेकरांनी ट्वीट करत राणेंना उत्तर दिलं. मिलिंद नार्वेकरांच्या ट्वीटला आता राणेंनी प्रत्युत्तर दिलं असून, मला बोलायला […]

Mumbaitak
follow google news

शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यात जुंपलेली असतानाच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर यांच्यात कलगितुरा रंगला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बॉयचं काम करणारा नेता झाला का? असं म्हटल्यानंतर मिलिंद नार्वेकरांनी ट्वीट करत राणेंना उत्तर दिलं. मिलिंद नार्वेकरांच्या ट्वीटला आता राणेंनी प्रत्युत्तर दिलं असून, मला बोलायला लावू नका’, असा इशारा दिला आहे.

हे वाचलं का?

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि किरीट सोमय्यांवर आरोप केले. संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला नारायण राणे यांनीही पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलं. याचं पत्रकार परिषदेनंतर मिलिंद नार्वेकर आणि नारायण राणे यांच्यात ‘ट्विट’वॉर रंगलं. झालं असं की संजय राऊतांसोबत पत्रकार परिषदे कुणीही नव्हतं असं राणे म्हणाले. यावेळी पत्रकारांनी शिवसेनेच्या नेत्यांसह मिलिंद नार्वेकर हेही होते असं म्हटलं.

सोमय्यांनी राणेंवर केलेले आरोप कुठे गेले?; अंजली दमानियांचा सवाल

त्यावर राणे म्हणाले, “कोण ओ मिलिंद नार्वेकर? पूर्वी मातोश्रीमध्ये बॉयचं काम करायचे ते काय? हो… माझ्यासमोरची गोष्ट आहे हो. मी पाहिलं आहे. बेल मारली की येस सर… काय आणू? असं म्हणणारा आता नेता बनला? काय अपग्रेडेशन स्पीड आहे हो, अशा शब्दात राणेंनी मिलिंद नार्वेकरांची खिल्ली उडवली.”

राणेंनी असं म्हटल्यानंतर मिलिंद नार्वेकरांनी ट्विट करून नारायण राणेंवर प्रहार केला. नार्वेकरांनी केलेल्या ट्वीटला राणे यांनीही लगेच उत्तर दिलं. राणे म्हणाले, “सुशांतसिंगच्या हत्येनंतर आपल्या फोनवरून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दोनवेळा कॉल केला होता हे आपण विसरलात की काय ? अश्या किती घटना मी आपणांस सांगू ? मला बोलायला लावू नका”, असा इशारा राणेंनी दिला.

‘मिलिंद नार्वेकर म्हणजे तोच का जो ‘बॉय’चं काम करायचा’, राणेंची नार्वेकरांवर बोचरी टीका

मिलिंद नार्वेकर काय म्हणाले?

“बॉय का? अच्छा! स्वतःच्या मेडिकल कॉलेजसाठी साहेबांकडून परवानगी मिळावी म्हणून दिवसभरात सात वेळा फोन करून विनंत्या केल्याचं विसरलात? वाजली का नाही तुमच्या मेमरीची घंटी?”, मिलिंद नार्वेकर यांनी ट्वीट करून म्हटलं होतं.

    follow whatsapp