मिथिलेश गुप्ता, डोंबिवली: आठवडी बाजारात फेरीवाल्यांकडून हप्ता उकळल्याप्रकरणी फेरीवाल्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मानपाडा पोलीस ठाण्यात संजय सिंग, नरेश, रोहन, मामा यांच्यासह माजी नगरसेवक कुणाल पाटील अशा पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी व्हीडिओत पैसे घेताना दिसत असलेल्या संजय सिंग याला अटक करत पुढील तपास सुरू केला आहे.
ADVERTISEMENT
याबाबत माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी आरोपांच खंडन करत बदनाम करण्यासाठी राजकीय षड्यंत्र आहे या संपूर्ण प्रकाराची पोलिसांनी शहानिशा करावी असे सांगितले. एकीकडे कोरोना काळात आठवडी बाजारांना बंदी घालण्यात आली असली तरी काही ठिकाणी हे बाजार बिनदिक्कत सुरू आहेत. या आठवडी बाजारांना राजकीय व प्रशासकीय वरदहस्त असल्याची चर्चा या प्रकारामुळे रंगली आहे.
नेमकं प्रकरण काय?
कल्याण पूर्व भागातील आडिवली परिसरात आठवडी बाजार भरवला जातो. कोव्हिडच्या काळात आठवडी बाजार बंद असताना या परिसरात मोठ्या प्रमाणात फेरीवाले बसतात. या फेरीवाल्यांना धंदा लावण्यासाठी हप्ता वसूल केली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याचा व्हीडिओसुद्धा समोर आला आहे.
या व्हीडिओत एक इसम फेरीवाल्यांकडून पैसे वसुली करताना दिसत आहे. या प्रकरणी फेरीवाल्यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
या प्रकरणी तक्रारदार महिला दीपाली जाधव यांनी काल तिच्याकडे दोन जण आले. त्यांनी पैशाची मागणी केली. आज धंदा झालेला नाही. मी पैसे देऊ शकत नाही असे त्यांना सांगितले मात्र, ते दोघे जबरदस्तीने पैसै मागण्यास सुरुवात केली. पैसे दिले नाही तर कुणाल पाटील यांच्या ऑफिसमधून काही लोक येतात आणि धमकवतात असा आरोप केला.
या प्रकरणात डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस ठाण्यात दीपाली यांच्या फिर्यादीनुसार पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये संजय सिंग, नरेश, रोहन, मामा यांच्यासह माजी नगरसेवक कुणाल पाटील यांचा समावेश आहे.
व्यापाऱ्यावर चाकूने प्राणघातक हल्ला, भाजपच्या माजी नगरसेवकास बेड्या
या प्रकरणी संजय सिंग या आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे. मात्र याबाबत कॅमेरासमोर बोलण्यास नकार देण्यात आला.
या प्रकरणी माजी नगरसेवक कुणाल पाटील यांचे म्हणणे आहे की, ‘हे राजकीय षड्यंत्र आहे. राजकीय खेळी करुन मला फसविण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझ्यावर केलेले आरोप खोटे आहेत. पोलिसांनी या प्रकरणाची शहानिशा करावी. मला आणि माझ्या कुटुंबीयांना योग्य न्याय द्यावा.’ असं कुणाल पाटील म्हणाले.
ADVERTISEMENT