नीलेश पाटील, नवी मुंबई: माजी मंत्री तथा भाजपा आमदार गणेश नाईक हे आता चांगलेच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. वाशी येथे खासगी क्लबमध्ये नोकरीस असणाऱ्या महिलेशी असणाऱ्या प्रेमसंबंधाचं प्रकरण आमदार नाईकांच्या अंगलट आलं आहे. कारण महिलेने आता नाईकांविरोधात बलात्काराची तक्रार नोंदवल्यानंतर याप्रकरणी गुन्हाही दाखल झाला आहे. त्यामुळे आता गणेश नाईक यांच्या अडचणी बऱ्याच वाढल्या असून आता त्यांना अटक केली जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
ADVERTISEMENT
नेमकं प्रकरण काय?
वाशी येथे सत्तावीस वर्षापूर्वी कामास असणाऱ्या एका महिलेशी गणेश नाईक यांनी ओळख वाढवली. या महिलेशी दूरध्वनीवरून संपर्क साधून नाईक यांनी सबंध प्रस्थापित केल्याचे महिलेने पोलिस तक्रारीत नमूद केले आहे. वाशी येथे वास्तव्यास असणाऱ्या तक्रारदार महिलेने नाईक यांच्यपासून मुलाला जन्म दिल्याचा दावा केला आहे.
आपला मुलगा पंधरा वर्षाचा असून या मुलाला हक्क मिळावा यासाठी या महिलेने पोलिसांना लेखी तक्रार दिली होती. मात्र पोलिसांनी न्यायालयात जाण्याचा सल्ला दिल्यावर या महिलेने राज्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर आणि विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे धाव घेतली होती.
या दोन्ही नेत्यांनी गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिल्यावर सीबीडी पोलिसांनी जीवे ठार करण्याचा एक गुन्हा दाखल करून एक दिवस उलटत नाही तोच दुसरा बलात्काराचा गुन्हा नेरुळ पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. या दोन गुन्ह्यांमुळे गणेश नाईक यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
तक्रार करणाऱ्या पीडित महिलेने आपल्या जीवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली आहे. सध्या बेलापूर येथे व्यवसाय करत असल्याने धमकी दिल्याचा गुन्हा सीबीडी बेलापूर येथे दाखल केला असून नेरुळ येथे निवासस्थान असल्याने बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिस्तूलचा धाक दाखवून धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. बारावीपर्यंत शिक्षित असणारी ही महिला मुलाची गुजरात राज्यातील असून तीस वर्षापेक्षा अधिक काळ नवी मुंबई शहरात वास्तव्यास आहे.
फॅशन डिझायन कोर्स केला असून वाशी येथील एका बड्या क्लबमध्ये ती कार्यरत होती. या क्लबमध्ये नाईक यांचे नियमित येणे जाणे होते. 1995 सालापासून नाईक व तक्रारदार महिलेचे सबंध होते.
या सबंधातून या महिलेने मुलाला जन्म दिला या मुलाच्या जन्मास विरोध असताना देखील या महिलेने मुलाला जन्म दिला. या मुलाला पाचव्या वर्षी वडिलांचे नाव देण्याचे आश्वासन नाईक दिले होते. मात्र, प्रत्यक्षात ते टाळाटाळ करत असल्याची तक्रार महिलेने केली आहे.
या दरम्यान ही तक्रारदार महिला गरोदरपणासाठी अमेरिकेतील न्यू जर्सी येथे गेली होती. अमेरिकेचे ग्रीन कार्ड असल्याने या मुलास आईचे नाव दिले. मुलगा दोन महिन्याचा असताना गणेश नाईक हे स्वतः तक्रारदार महिलेला व मुलाला घेण्याकरीता अमेरिका येथे गेल्यावर ऑक्टोबर 2007 मध्ये नाईक यांच्या समवेत मुलगा व महिला मुंबई मध्ये माघारी आले होते. असं महिलेने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.
गणेश नाईकांवर महिलेनं आरोप केलेलं लिव्ह इनचं ‘ते’ प्रकरण काय?
हा संपूर्ण घटनाक्रम तक्रारीत नमूद करून आमदार गणेश नाईक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता हा गुन्हा दाखल झाल्यानंतर गणेश नाईक यांच्यावर अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT