मुंबई: ‘उद्धव ठाकरे हे बिनकामाचे पगारी मुख्यमंत्री आहेत’, अशी टीका अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. ‘मातोश्री’बाहेर जाऊन आपण हनुमान चालीसा पठण करणारच या आपल्या भूमिकेवर आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा हे ठाम आहेत. त्यासाठी ते आज सकाळी मुंबईतही दाखल झाले आहेत.
ADVERTISEMENT
एकीकडे राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झाल्याने शिवसैनिक हे मोठ्या प्रमाणात मातोश्रीबाहेर जमा झाले असून ते राणा दाम्पत्याविरोधात दुपारपासून जोरदार घोषणाबाजी सुरु आहे. याचवेळी राणा दाम्पत्याने देखील पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
पाहा नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर नेमकी काय टीका केली:
‘माझ्या महाराष्ट्राला जो शनी आणि साडेसाती लागली आहे.. एक व्यक्ती तो महाराष्ट्राचं नेतृत्व करतो.. मुख्यमंत्री आहेत.. प्रथम नागरिक आहेत आपल्या महाराष्ट्राचे. जर असं वाटत असेल की, ते जर दोन ते अडीच वर्ष ऑफिसमध्येच जात नसतील.. समजा, एखादा साधा व्यक्ती दोन वर्ष आपल्या ऑफिसमध्ये गेला नाही तर मला वाटतं की, कोणी त्याला पगारही देत नाही. हे तर बिनकाम पगारी आमचे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्रात.’
‘ज्यांनी काहीही काम केलेलं नाही. एवढं असूनही ते अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून कायम आहेत. त्यांनी आमच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना संकटात टाकलं आहे. बेरोजगारांना संकटात टाकलं आहे. रोजगार नाहीए. लोडशेडिंग एवढी वाढली आहे की, आमचे जे मंत्री आहेत.. ते म्हणतायेत आपलं महाराष्ट्र अंधारात गेला तरी कोणालाही धक्का बसू नये. ही अवस्था आपली, त्या खात्याची आहे.’
‘या सगळ्या गोष्टींवर त्यांनी उत्तर दिलं पाहिजे. बिनपगारी मुख्यमंत्री आहेतच.. आम्ही आधीही म्हटलं आहे की, पोलिसांनी जी नोटीस दिली आहे की, तुम्ही सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करु नये. मला वाटतं की, आता तर आम्ही दोघं जणच पत्रकार परिषद घेत आहोत. जर सुव्यवस्था कोणी बिघडवत असेल तर ते शिवसैनिक बिघडवत आहेत. त्यांना ज्यांचा पाठिंबा आहे ते आहे मुख्यमंत्री साहेब.’
‘जर एवढा विरोध फक्त हनुमान चालीसाला? का आहे एवढा विरोध.. कशासाठी आहे? याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. ज्या विचारधारेवर त्यांनी आजवर आपली राजकीय पोळी भाजून घेतली आहे, ज्यांची तिसरी पिढी देखील मंत्री आहे. त्यांनी हे सांगितलं पाहिजे की, त्यांनी आपली विचारधारा जी बाळासाहेबांनी दिली होती ती कुठे ना कुठे विसरले आहेत. मला वाटतं की, हे सकंट आणि साडेतीन माझ्या महाराष्ट्रावर आलं आहे.’
‘मला हनुमान चालीसा पठण करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. शिवसैनिकांचं गेल्या अनेक वर्षांपासून हेच काम राहिलं आहे. फक्त धमकी देणं हेच काम शिवसैनिक गेल्या काही वर्षांपासून करत आले आहेत. आता तर मुख्यमंत्री आहेत त्यामुळे जास्तच पॉवर आली आहे. मला वाटतं जे मुख्यमंत्री बोलतात तेच शब्द शिवसैनिकांच्या जीभेवर असतात.’
‘बाळासाहेबांचे विचार असते तर हनुमान चालीसाला कधीही शिवसेनेने विरोध केला नसता. जे खरे शिवसैनिक आहेत ज्यांनी खालच्या स्तरापासून काम केलं आहे त्यापैकी एकही शिवसैनिक इथं नाहीएत.’
मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचणारच! रवी राणा आणि नवनीत राणांचा निर्धार
‘संजय राऊत यांच्याबाबत काय बोलणार ते रोजच पोपटासारखे बोलत असतात बिचारे. एखादी मिरची दिली तर शांत बसतील.’ अशा शब्दात राणा दाम्पत्याने शिवसेनेवर हल्लाबोल चढवला आहे.
ADVERTISEMENT