हनुमान चालीसा, लाऊडस्पीकर लावून काश्मिरी पंडीतांची समस्या दूर होणार नाही – संजय राऊत

मुंबई तक

• 01:00 PM • 13 May 2022

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काश्मिरी पंडीताच्या हत्येवरुन पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीका केली आहे. हनुमान चालीसा पठण केल्याने, लाऊडस्पीकर लावल्यामुळे काश्मिरी पंडीतांच्या समस्या दूर होणार नाहीयेत. केंद्र सरकारने यासाठी कठोर पावलं उचलणं गरजेचं असून जनतेच्या मनातली असुरक्षिततेची भावना संपवणं गरजेचं असल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत. जम्मू-काश्मीरच्या बुडगाम जिल्ह्यात राहुल भट या काश्मिरी पंडीत सरकारी […]

Mumbaitak
follow google news

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काश्मिरी पंडीताच्या हत्येवरुन पुन्हा एकदा केंद्र सरकारवर टीका केली आहे. हनुमान चालीसा पठण केल्याने, लाऊडस्पीकर लावल्यामुळे काश्मिरी पंडीतांच्या समस्या दूर होणार नाहीयेत. केंद्र सरकारने यासाठी कठोर पावलं उचलणं गरजेचं असून जनतेच्या मनातली असुरक्षिततेची भावना संपवणं गरजेचं असल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत.

हे वाचलं का?

जम्मू-काश्मीरच्या बुडगाम जिल्ह्यात राहुल भट या काश्मिरी पंडीत सरकारी कर्मचाऱ्याची दहशतवाद्यांनी गोळ्या घालत हत्या केली. या हत्येनंतर काश्मीर खोऱ्यातलं वातावरण पुन्हा एकदा तणावग्रस्त झालं आहे.

“प्रत्येक वेळी पाकिस्तानकडे बोट दाखवून चालणार नाही. काश्मिरी पंडीतांसाठी आपण काय करतोय? 370 कलम हटवल्यानंतरही काश्मिरी पंडीतांना तिकडे सुरक्षित वाटत नाहीये आणि ते आपल्या घरी परतायला तयार नाहीयेत. काश्मिरी पंडीत सोडून द्या आता तिकडची सर्वसामान्य जनताही सुरक्षीत नाहीये.”

जम्मू-काश्मीरमध्ये असुरक्षिततेचं वातावरण तयार करण्यात आलं हे कठोर निर्णय घेऊनच संपू शकतं. हनुमान चालीसा, लाऊडस्पीकर यासारखे मुद्दे निर्माण करुन ना काश्मिरी पंडीतांच्या समस्या दूर होणार आहेत ना काश्मीरच्या, अशा शब्दात संजय राऊतांनी केंद्र सरकारला सुनावलं आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी या समस्येकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

हत्या करण्यात आलेला काश्मिरी पंडीत हा सरकारी कर्मचारी होता. नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे काश्मिरी पंडीतांच्या मुद्द्यावर चांगलेच भावूक आहेत. काश्मिरी पंडीतांना त्यांच्या मूळ घरी परत आणण्याच्या चर्चा सुरु होत्या. सात वर्षांमध्ये किती काश्मिरी पंडीत परतले हे मला माहिती नाही. परंतू जे सध्या तिकडे राहत आहेत त्यांनाही शांतपणे जगू न देता मारलं जात आहे. अमित शहांनी याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. राहुल भट या काश्मिरी पंडीताची हत्या होणं हे खरंच वेदनादायी आहे असंही संजय राऊत म्हणाले.

    follow whatsapp