RSS च्या इमारतीची जैश-ए-मोहम्मदकडून रेकी ही अतिशय गंभीर बाब: फडणवीस

मुंबई तक

• 08:48 AM • 08 Jan 2022

योगेश पांडे, नागपूर: जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटविल्यानंत अतिरेकी संघटनांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळेच नागपूर येथील आरएसएसच्या कार्यालयावर जैश-ए-मोहमद संघटनेने रेकी केली आहे. असं वक्तव्य भाजप नेते गिरीश महाजन यांनी काल (7 जानेवारी) जळगावात केलं होतं. ज्यावर आता देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. पाहा देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले: ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इमारतींची जैश-ए-मोहम्मदकडून रेकी […]

Mumbaitak
follow google news

योगेश पांडे, नागपूर: जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटविल्यानंत अतिरेकी संघटनांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळेच नागपूर येथील आरएसएसच्या कार्यालयावर जैश-ए-मोहमद संघटनेने रेकी केली आहे. असं वक्तव्य भाजप नेते गिरीश महाजन यांनी काल (7 जानेवारी) जळगावात केलं होतं. ज्यावर आता देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

हे वाचलं का?

पाहा देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले:

‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इमारतींची जैश-ए-मोहम्मदकडून रेकी केली जाणे अतिशय गंभीर बाब आहे. याची माहिती आता पोलिसांना आणि केंद्रीय यंत्रणांना मिळाली आहे. त्यामुळे यासंदर्भात योग्य खबरदारी महाराष्ट्राचे पोलीस आणि केंद्रीय यंत्रणा घेतील असा विश्वास आहे. याला अत्यंत गांभीर्याने घेतले पाहिजे.’ अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवी यांनी दिली आहे.

नागपुरात मोठ्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. दहशतवादी संघटना शहरात घातपाती कारवाया करण्याचा कट आखत असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शुक्रवारी दिली.

यामध्ये जैश-ए-मोहम्मदचे नाव पुढे येत आहे. त्यांनी सांगितले की, मागील काही दिवसांपूर्वी आम्हाला माहिती मिळाली की, जैश-ए-मोहम्मदच्या काही दहशतवाद्यांनी नागपुरात काही ठिकाणी रेकी केली आहे. अशा प्रकारे रेकी केल्याप्रकरणी प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा देखील नोंदविण्यात आला आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास नागपूर गुन्हे शाखा करत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी नागपुरातील अनेक प्रसिद्ध परिसरांचे फोटो आणि व्हीडिओ बनवले आहेत. या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. सर्वत्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच ठिकठिकाणी नाकाबंदी देखील करण्यात आली आहे. बाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली जात आहे.

घातापती कारवायाच्या अलर्टनंतर नागपूरमधील सर्व पोलिसांच्या सुट्या रद्द करण्यात आल्याचे पोलिस आयुक्तांनी यावेळी सांगितले. आता सध्या पोलीस सर्व प्रमुख ठिकाणी बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासत आहेत.

यापूर्वी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये आरएसएसच्या नेत्यांवर हल्ल्याचा कट रचल्याची देखील समोर आलं होतं. हल्ल्यासाठी दहशतवादी आयईडी किंवा स्फोटकांनी भरलेल्या वाहनाचा वापर करू शकतात, असे त्यावेळी सांगण्यात आले होते. त्यादरम्यान, इंटेलिजन्स ब्युरो दिल्लीनुसार, महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान आणि ईशान्येकडील राज्यांच्या नेते लक्ष्य असल्याचं सांगण्यात येत होतं.

Terror Funding case : जमात-ए-इस्लामी अतिरेकी संघटनेशी संबंधित ५० ठिकाणांवर NIA ची छापेमारी

‘कलम 370 हटविल्यानंतर अतिरेकी संघटनांचे धाबे दणाणले’

नागपूर येथील आरएसएसच्या कार्यलयाची जैश-ए-मोहमद संघटनेने रेकी केली असून अतिरेकी संघटनांचे धाबे दणाणले असून त्यातूनच हा प्रकार घडला आहे. अशी प्रतिक्रिया भाजप नेते गिरीश महाजन यांनी दिली होती.

कलम 370 हटविल्यानंतर अतिरेकी संघटनांचे धाबे दणाणले असून यातूनच हा प्रकार झाल्याची प्रतिक्रिया गिरीष महाजन यांनी दिली होती. तसेच पंजाब येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेबाबत ही काँग्रेसवर यावेळी भाजप त्यांनी टीका केली होती.

    follow whatsapp