मुकेश अंबानी यांची रिलायन्स रिटेल ही कंपनी रेस्तराँ क्षेत्रात उतरण्याच्या तयारीत आहे. यासाठी जगातली सर्वात मोठी सिंग ब्रांड रेस्तराँ चेन असलेल्या Subway सोबत त्यांची बोलणी सुरू आहेत. सबवेची भारतातील फ्रँचाईजी घेण्यासाठी रिलायन्स रिटेल उत्सुक आहे. 1488 कोटी ते 1860 कोटी च्या दरम्यान ही फ्रँचाईजी घेण्याची तयारी रिलायन्स रिटेलने दर्शवली आहे. सबवे इंक आणि रिलायन्स रिटेल यांच्यतला हा व्यवहार यशस्वीपणे पूर्ण झाला तर भारतात असलेल्या टाटा समूहाच्या स्टारबक्स आणि ज्युबिलिएंट समूहाला रिलायन्स रिटेल टक्कर देऊ शकतं. ज्युबिलिएंट समूहाचे डॉमिनोज पिझ्झा, बर्गर किंग हे ब्रांड प्रसिद्ध आहेत.
ADVERTISEMENT
पेट्रोकेमिकल, केमिकल्स, डिजिटल, अन्नधान्य, फर्निचर, रिटेल या क्षेत्रात रिलायन्सचे त्यांचं नाव कमावलं आहे. रिलायन्स मार्ट, रिलायन्स रिटेल, जिओ ही त्याची काही उदाहरणं आहेत. आता हाच समूह रेस्तराँ क्षेत्रातही पाऊल ठेवण्यास उत्सुक आहे. Business Today ने यासंदर्भातले वृत्त दिले आहेत. जर रिलायन्स रिटेल आणि सब वे इंक यांच्यातला व्यवहार पूर्ण झाला तर भारतात असलेल्या 600 हून अधिक सबवे स्टोअर्सचे नेटवर्क रिलायन्सला मिळू शकतं असं एका अहवालात म्हण्यात आलं आहे.
सबवे इंक ही ग्लोबल चेन आहे, ही चेन भारतात 2001 पासून आहे. देशभरात त्यांची 600 हून अधिक रेस्तराँ आहेत. ही कंपनी भारतात फ्रँचायजी तत्त्वार काम करते आहे. आता ही फ्रँचाईजी घेण्यासाठी रिलायन्स उत्सुक आहे. सबवे इंक आणि आणि रिलायन्स रिटेल यांच्यातला व्यवहार जर पूर्ण झाला तर रिलायन्स रिटेल ही कंपनी रेस्तराँ क्षेत्रात अत्यंत वेगाने वाटचाल करणार यात शंका नाही.
सिंगल ब्रांड व्यवसायात रिलायन्स समूह आणि आपल्या रिटेल कारभाराच्या मदतीने विस्तार करण्याची योजना आखतं आहे. सध्याच्या घडीला रिलायन्सने रिटेल, धान्यविक्री, गृहपयोगी इलेक्ट्रॉनिक्स आणि लाईफस्टाईल या क्षेत्रांमध्ये आता चांगला जम बसवला आहे. त्यानंतर आता रेस्तराँ क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी रिलायन्स रिटेल सज्ज झालं आहे. सबवे आणि रिलायन्स रिटेल यांच्यात हा व्यवहार व्हावा अशी मुकेश अंबानी यांची इच्छा आहे आणि ते यासाठी उत्सुक आहेत असंही कळतं आहे.
सध्या सबवे इंकची फ्रँचायची ही डाबरच्या अमित बर्मन यांच्या मालकीच्या बाईट फुड्सकडे आहे. मात्र मालकी डॉक्टर्स असोसिएटकडे आहे. त्यांना प्रत्येक फ्रँचायजीसाठी 8 टक्के महसूल मिळतो. भारतामध्ये या क्षेत्रातील उलाढाल जवळपास 18 हजार कोटींच्या आसपास आहे. 21 टक्के हिश्श्यासह डॉमिनेज या क्षेत्रात आघाडीवर आहे. दुसऱ्या क्रमांकावर मॅकडोनाल्ड्स असून त्यांचा हिस्सा 11 टक्के इतका आहे.
ADVERTISEMENT