ADVERTISEMENT
ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे ब्रेक लागल्यानंतर मुंबईसह राज्यातील शाळा आजपासून सुरु करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
कोरोनाची रुग्णसंख्या लक्षात घेता शाळा सुरु करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने स्थानिक प्रशासनावर सोडला आहे.
मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत झालेली घट लक्षात घेता आजपासून शाळा पुन्हा उघडण्यात आल्या आहेत.
मुंबईच्या अंधेरी भागातील महापालिका शाळेत आज पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं अशा पद्धतीने स्वागत करण्यात आलं.
शासनाच्या सर्व नियमांचं पालन करुन यावेळी विद्यार्थ्यांना आत प्रवेश देण्यात आला.
बऱ्याच दिवसांनी शाळा सुरु झाल्यामुळे विद्यार्थी उत्साहात दिसत होते.
प्रत्येक विद्यार्थ्याचं बाई स्वागत करत होत्या.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत रुग्णसंख्या रोडावल्यानंतर अनेक पालकांनी शाळा पुन्हा सुरु करण्याची मागणी केली होती.
पहिल्या दिवशी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कोरोनापासून स्वतःचं रक्षण करण्यासाठीचे सर्व नियम समजावून सांगितले.
पहिल्या दिवशी अभ्यासाचा फार ताण नको म्हणून शिक्षकांनी विविध Activity च्या माध्यमातून सुरुवात केलेली पहायला मिळाली.
शाळा सुरु झाल्यानंतर एखाद्या विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाली तर शाळा बंद करायची की नाही याबद्दल अद्याप संभ्रम आहे.
म्हणूनच पहिल्या दिवशी कोरोनाची परिस्थिती निवळून शाळा कायम सुरु राहू देत अशी प्रार्थना या लहानग्यांनी देवाकडे केली असेल…
ADVERTISEMENT