दुःख शब्दात व्यक्त करता येणार नाही; राजीव सातव यांच्या निधनानंतर रितेश देशमुख भावूक

मुंबई तक

• 08:46 AM • 16 May 2021

काँग्रेसचे दिग्गज नेते आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांचं आज कोरोनामुळे निधन झालं आहे. कोरोना संसर्गानंतर राजीव सातव यांच्यावर पुण्यातील जहाँगीर रुग्णालयात उपचार सुरु होते. गेल्या 23 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास त्यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. यावर अभिनेता रितेश देशमुख याने ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. अभिनेता […]

Mumbaitak
follow google news

काँग्रेसचे दिग्गज नेते आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांचं आज कोरोनामुळे निधन झालं आहे. कोरोना संसर्गानंतर राजीव सातव यांच्यावर पुण्यातील जहाँगीर रुग्णालयात उपचार सुरु होते. गेल्या 23 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास त्यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. यावर अभिनेता रितेश देशमुख याने ट्विट करत शोक व्यक्त केला आहे.

हे वाचलं का?

अभिनेता रितेश देशमुख त्याच्या ट्विटमध्ये म्हणाला, “राजीव सातव यांच्या निधनाची बातमी अतिशय धक्कादायक आहे. या घटनेने मला अतिशय दु:ख झालं आहे. हे दुःख शब्दात व्यक्तही करता येणार नाही. सातव यांचं नेतृत्व तरुण आणि स्फोटक होतं, मोठं राजकीय करिअर त्यांच्यासमोर उभं होतं. त्यांना माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांना हे दु:ख सहन करण्याच ताकद मिळो.”

कोरोनाची लागण झाल्याने राजीव सातव यांना तब्बल 23 दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. राजीव सातव यांना एप्रिलमध्ये कोरोनाची लागण झाली होती. 22 एप्रिलला त्यांचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

त्यानंतर तीन दिवसांनी म्हणजे 25 एप्रिलला त्यांना अधिक त्रास जाणवू लागल्याने पुण्यातील जहाँगीर सुपरस्पेशलिटी हॉस्पिटलमधीले आयसीयूमध्ये भरती करण्यात आलं होतं. तसेच तेव्हापासून त्यांच्यावर आवश्यकतेनुसार सर्व उपचार करण्यात येत होते. मात्र, काल त्यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाला आणि त्यातच त्यांचं निधन झालं.

    follow whatsapp