कोरोनाची दुसरी लाट सध्या आटोक्यात येत असल्याचं चित्र आहे. कोरोनाचा धोका अद्याप पूर्णपणे संपलेला नाही. प्रशासनाने नागरिकांना सवलत दिली असली तरीही सोशल डिस्टन्सिंग, मास्क अशा नियमांचं पालन करणं बंधनकारक करण्यात आलंय. परंतू दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना बाजारपेठांमध्ये झुंबड उडालेली पहायला मिळते आहे.
ADVERTISEMENT
डोंबिवलीत रविवारी संध्याकाळी स्टेशनजवळील बाजारपेठेच नागरिकांची खरेदीसाठी तोबा गर्दी पहायला मिळाली.
दिवाळीच्या आधी शेवटचा रविवार असल्यामुळे नागरिक खरेदीसाठी रस्त्यावर उतरले होते. डोंबिवली स्टेशनसोबतच डोंबिवली पश्चिमेतील गुप्ते रोड, दिन दयाळ रोड , सम्राट चौकात आणि पूर्वेतील केळकर रोड, फडके रोड, राथ रोड, गोग्रासवाडी मध्ये खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. या गर्दीत कोरोनाच्या सर्व नियमांचं सर्रास उल्लंघन होताना पहायला मिळालं.
या गर्दीत एक अँब्यूलन्स अडकून राहिली, तिला बाहेर पडण्यासाठी प्रचंड वेळ गेला. दुकानांसोबतच पथविक्रेत्यांनीही रस्त्यावर आपले स्टॉल मांडल्यामुळे या गर्दीत आणखीनच वाढ झालेली पहायला मिळाली. मानपाडा रस्ता, कल्याण- डोंबिवली रस्ता इत्यादी रस्त्यावर भयंकर वाहतूक कोंडी असल्याने नागरिकांना मनसंताप सहन करावा लागत आहे. कोरोना आहे की या गर्दीत पायाखाली येऊन चिरडून गेला ? असा प्रश्न नागरिक विचारताना दिसत आहेत.
ADVERTISEMENT