ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण सरकारने संपवलं असा आरोप करत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात चक्काजाम आंदोलन करण्यात येतं आहे. यावेळी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी भाजपवर आणि खास करून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. ते आंदोलन करताना मा. खडसे, मुंडे, तावडे, बावनकुळे या ओबीसी आणि बहुजन नेत्यांचा राजकीय बळी का घेतला? हा प्रश्न रोहिणी खडसेंनी विचारला आहे. हे ट्विट करून रोहिणी खडसे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
ADVERTISEMENT
आजचं भाजपाचं ओबीसी आरक्षणासंदर्भात चक्काजाम आंदोलन हास्यास्पद आहे. फक्त राजकारण करण्यासाठी हे आंदोलन आहे. आरक्षण ओबीसी समाजाला मिळायलाच हवं यात कोणाचेही दुमत नाही, फक्त यात राजकारण करू नका, असंही रोहिणी खडसे म्हणाल्या.
OBC समाजाची फसवणूक आणि विश्वासघात ठाकरे सरकारने थांबवावा-फडणवीस
फडणवीसांना सवाल
इतकंच नाही तर रोहिणी खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही सवाल केला आहे. ‘आदरणीय फडणवीस साहेब. तुम्ही ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश काढल्यानंतर 1/8/2019 रोजी तसेच दि. 18/9/2019 रोजी राज्य सरकारकडून केंद्राकडे इंपिरिकल डाटा मागितला होता ना? तो मिळाला नाही. खरंतर तेव्हाच अध्यादेशाद्वारा केलेले आरक्षणातील बदल टिकणार नाही, हे तुम्हाला माहित व्हायला हवे होते’ असं रोहिणी खडसेंनी ट्विट केलं आहे.
OBC आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपने आज चक्काजाम आंदोलन पुकारलं आहे. ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळावं यासाठी राज्यभरात 1 हजार ठिकाणी हे आंदोलन केलं जातं आहे असा दावा भाजपने केला आहे. भाजपच्या कार्यकारिणीची बैठक दोन दिवसांपूर्वी झाली तेव्हा पंकजा मुंडे यांनीही ही माहिती दिली होती. ओबीसी समाजाला आरक्षण मिळावं म्हणून ठिकठिकाणी भाजपचे नेते रस्त्यावर उतरले आहेत.
ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळाल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही असं सरकारमधले मंत्रीच सांगत होते. ही घोषणा केल्याच्या दुसऱ्याच दिवशी नंदुरबार आणि इतर ठिकाणच्या निवडणुका जाहीर झाल्या मग सरकारमधले मंत्री गप्प का? असा प्रश्नही पंकजा मुंडे यांनी विचारला होता. आता आज भाजपने एकीकडे आंदोलन सुरू केलेलं असताना रोहिणी खडसे यांनी ट्विट करून भाजपला आणि देवेंद्र फडणवीस यांना सवाल विचारला आहे.
ADVERTISEMENT