Video : पाय घसरला अन् चिमुकल्यासह कोसळली आई! मानखुर्द रेल्वे स्टेशनवर थरकाप उडवणारी घटना

मुंबई तक

• 03:44 AM • 02 Nov 2022

–एजाज खान, मुंबई काळ आला होता पण वेळ आली नव्हती, या म्हणीचा प्रत्यय देणारी घटना मुंबईतल्या मानखुर्द रेल्वे स्थानकात घडली. एका वर्षाच्या चिमुकल्यासह आईला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात आरपीएफ जवानांना यश आलं. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून,अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर आलाय. मुंबईतल्या मानखुर्द रेल्वे स्थानकावर अचानका आरडाओरड अन् धावपळ सुरू झाली. जेव्हा एका […]

Mumbaitak
follow google news

एजाज खान, मुंबई

हे वाचलं का?

काळ आला होता पण वेळ आली नव्हती, या म्हणीचा प्रत्यय देणारी घटना मुंबईतल्या मानखुर्द रेल्वे स्थानकात घडली. एका वर्षाच्या चिमुकल्यासह आईला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात आरपीएफ जवानांना यश आलं. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून,अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर आलाय.

मुंबईतल्या मानखुर्द रेल्वे स्थानकावर अचानका आरडाओरड अन् धावपळ सुरू झाली. जेव्हा एका वर्षाच्या मुलासह महिला धावत्या लोकलमधून खाली कोसळली. माय लेकरांवर काळ झडप घालणार इतक्या आरपीएफच्या जवानांनी धाव घेतली अन् दोघांनाही बाजूला खेचलं.

मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी (३१ ऑक्टोबर) दुपारी १२ वाजता सुमन सिंह नावाची महिला आपल्या एक वर्षाच्या लेकरासह मानखुर्दवरून कोपरखैरणेला जाण्यासाठी निघाली होती.

महिला १ वर्षाच्या मुलाला घेऊन लोकलमध्ये चढली. लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती. प्लॅटफॉर्मवरून लोकल सुटल्यानंतर सुमन सिंह यांचा अचानक पाय घसरला. त्यामुळे १ वर्षाच्या मुलासह महिला धावत्या लोकलमधून खाली कोसळली.

सीसीटीव्हीमध्ये मुलासह महिला कोसळताना दिसत आहे. महिला खाली कोसळल्याचं दिसताच तिथे असलेल्या आरपीएफ जवानाने धाव घेतली आणि खाली पडलेल्या महिलेच्या हातातून मुलाला स्वतःकडे घेतलं.

सुमन सिंह या लोकल आणि प्लॅटफॉर्ममध्ये फरफटत पुढे जात होत्या. त्याचवेळी एका प्रवाशांना धाडस दाखवत सुमन सिंह यांना प्लॅटफॉर्मच्या दिशेनं खेचलं आणि महिलेची मृत्यूच्या दाढेतून सुटका केली. आरपीएफ जवान आणि प्रवाशांच्या सतर्कतेमुळे माय लेकरांना नवं आयुष्य मिळालं.

मुंबईत लोकलमधून प्रवाशी कोसळण्याच्या घटना सातत्यानं घडत असतात. प्रवाशी वेळेत पोहोचण्याच्या घाईत धावत्या लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न करतात आणि त्यातून अशा घटना घडल्याचं वारंवार समोर आलंय. अनेकदा आरपीएफ जवानांमुळे मृत्यूचा धोका टळतो, मात्र काही वेळा प्रवाशांना जीव गमावावा लागतोय.

    follow whatsapp