शिवाजी पार्क मैदानावर पर्यायी भूखंड उपलब्ध करून द्या,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मागणी

मुस्तफा शेख

• 03:15 PM • 13 Apr 2022

मुंबईतल्या दादरमध्ये असलेल्या शिवाजी पार्क मैदानावर बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृतीस्थळ आहे. या स्मृती स्थळाच्या शेजारी भूखंड देण्याऐवजी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मुंबई महापालिकेकडे केली आहे. या संदर्भातलं एक पत्र RSS ने मुंबई महापालिकेला दिलं आहे. आरएसएस, विहिंप, बजरंग दलही तालिबानसारखेच; गीतकार जावेद अख्तर यांचं विधान बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती […]

Mumbaitak
follow google news

मुंबईतल्या दादरमध्ये असलेल्या शिवाजी पार्क मैदानावर बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृतीस्थळ आहे. या स्मृती स्थळाच्या शेजारी भूखंड देण्याऐवजी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मुंबई महापालिकेकडे केली आहे. या संदर्भातलं एक पत्र RSS ने मुंबई महापालिकेला दिलं आहे.

हे वाचलं का?

आरएसएस, विहिंप, बजरंग दलही तालिबानसारखेच;
गीतकार जावेद अख्तर यांचं विधान

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाला लागून असलेल्या भूखंडावर आमचे कार्यक्रम, उपक्रम राबवण्यात अडचणी येत आहेत. याच कारणामुळे आम्हाला पर्यायी भूखंड दिला जावा. एवढंच नाही तर नाना-नानी पार्क जवळचा मोकळा पर्यायी भूखंड आरेखन करून द्यावा अशी मागणी संघाने केली आहे.

काय आहे संघाने लिहिलेलं पत्र?

जी/ उत्तर विभाग दादर (प) शिवाजी पार्क येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या नावे व्ही.एल.टी. तत्वावर १७५५ चौ.मी. क्षेत्रफळाच्या मोकळ्या भूखंडाचा भाडेपट्टा वर्ष १९६७ पासून महापालिकेने दिलेला आहे. वर्ष १९६७ पासून वर्ष २००७ पर्यंत आम्ही मोकळ्या भूखंडाच्या भाडेपट्ट्याचे भूभाडे (VLT RENT) भरलेले आहे. त्याच्या पावत्या सोबत जोडत आहोत. प्रशासकीय अधिकारी (मालमत्ता) जी/ उत्तर विभाग यांनी वर्ष २००८ पासून भूभाडे घेण्यापूर्वी जागेचे आरेखन करण्यासाठी आग्रह धरल्याने आणि प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतर आजतागायत जागेचे आरेखन न झाल्याने प्रशासकीय कारणास्तव वर्ष २००८ पासून आजतागायत भूभाडे थकीत आहे. आम्ही हे भूभाडे भरण्यास तयार आहोत. तसंच यापूर्वीही वारंवार भूभाडे भरण्यासाठी प्रशासकीय अधिकारी (मालमत्ता) जी/ उत्तर विभाग यांच्याकडे गेलो असता ते आरेखनाशिवाय स्वीकारण्यास असमर्थता दर्शवली. या एकाच कारणामुळे भूभाडे थकीत राहिले आहे..

Nagaland येथील स्वयंसेवकाचा किस्सा सांगत शरद पवारांनी केलं RSS चं कौतुक!

वर्ष १९३६ पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची दैनंदिन शाखा शिवाजी पार्क मैदानात लागते. वर्ष १९६७ पासून VLT भूखंड राष्ट्रीय स्वयंसेवक संघास वितरित केलेला आहे. या १७५५ चौ.मी. क्षेत्रफळाच्या मोकळ्या भूखंडाचे भूभाडे वर्ष २००७ पर्यंत भरलेले आहे. या व्ही.एल.टी. भूखंडाचा मालमत्ता कर ०१.०४.१९६७ पासून वर्ष २०२१-२२ पर्यंत भरलेला आहे. याबाबत कागदपत्रे सोबत जोडीत आहोत.

आमच्या सध्याच्या VLT भूखंडाजवळ स्मृतीस्थळ आल्यामुळे आम्हाला आमच्या ताब्यातील VLT भूखंडावर आमचे उपक्रम राबविण्यास अडचणी येत आहेत. तसेच स्मृती स्थळामुळे जागेचे आरेखन करणे जिकीरीचे होईल असे वाटते. वरील वस्तुस्थिती लक्षात घेता आम्ही आपणांस विनंती करतो आहोत की आम्हाला पर्यायी भूखंड उपलब्ध करून द्यावा.

१) सदर जागेचे थकीत भूभाडे (VLT RENT) तातडीने स्वीकारण्यात यावे.

२) स्मृती स्थळाची वाढती व्याप्ती लक्षात घेता सदर भूभागाऐवजी शिवाजी पार्क मैदानाजवळील नाना नानी पार्क जवळील मोकळा पर्यायी भूखंड भाडेपट्ट्यावर जागेचे आरेखन करून देण्यात यावा.

    follow whatsapp