भारत सध्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करतो आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली आहेत. हर घर तिरंगा या मोहिमेलाही मोदी सरकारने सुरूवात केली आहे. तसंच What’s App च्या डीपीवरही तिरंगा ठेवण्यात यावा असंही आवाहन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन करूनही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) डीपी म्हणून तिरंगा ठेवला नाही. यानंतर संघाला तिरंग्याबाबत तिरस्कार आहे अशी टीका होऊ लागली. काँग्रेसचे नेते जवाहरलाल नेहरूंनी हाती तिरंगा घेतला आहे हा फोटो डीपी म्हणून ठेवत आहेत. तर संघावर टीका होऊ लागली आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी याबाबत उत्तर दिलं आहे.
ADVERTISEMENT
पुढील १५ वर्षात अखंड भारत पाहण्यास मिळेल, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं वक्तव्य
संघ तिरंगा झेंड्याचा तिरस्कार करतो असा काँग्रेसचा आरोप
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने डीपी म्हणून ट्विटरवर तिरंगा ठेवलेला नाही. त्यांचं जे चिन्ह आहे तेच त्यांनी ठेवलं आहे. यावरून आता आरएसएसवर टीका होऊ लागली आहे. मात्र मोहन भागवत यांनी विषयीची भूमिका स्पष्ट केली. संघ तिरंगा झेंड्याचा तिरस्कार करतो हा आरोप काँग्रेसने केला आहे. अशात तिरंगा आणि संघाचं नातं काय? हे सरसंघालक मोहन भागवत यांनी सांगितलं आहे.
“प्रत्येक मशिदीत शिवलिंग का शोधायचं?” मोहन भागवत यांचं ज्ञानवापीबाबत मोठं वक्तव्य
काय म्हटलं आहे मोहन भागवत यांनी तिरंगा झेंडा आणि संघाच्या नात्याविषयी?
कायम हा प्रश्न उपस्थित केला जातो की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भगवा झेंडा फडकवतो तिरंगा नाही. मात्र मी तुम्हाला सांगू इच्छितो की तिरंगा झेंडा जन्माला आला तेव्हापासून संघ त्याच्यासोबत ठामपणे उभा आहे. मी तुम्हाला सत्यकथा सांगतो आहे. जेव्हा तिरंगा झेंडा आपला ध्वज असेल हे निश्चित झालं तेव्हा फैजपूरमध्ये काँग्रेसच्या अधिवेशात तिरंगा फडकवला गेला. त्यावेळी ध्वजस्तंभ ८० फूट उंच होता असंही मोहन भागवत यांनी सांगितलं.
पंडित नेहरू हे त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते त्यांच्या हस्ते हा तिरंगा फडकवला जाणार होता. पंडित नेहरूंनी तिरंगा फडकवण्यासाठी दोरी ओढली तेव्हा तो ध्वज पूर्ण म्हणजे ८० फूट वर गेला नाही मधे लटकू लागला. एवढं उंच जाऊन दोरीचा गुंता सोडवण्याचं साहस कुणामध्येच नव्हतं. तेवढ्यात गर्दीतून एक तरूण आला. तो सरसर खांबावर चढला, त्याने गुंता सोडवला त्यामुळे ध्वज ८० फूट वर जाऊन फडकला. आता ही घटना घडल्यानंतर स्वाभाविकपणे त्या तरूणाला तिथल्या लोकांनी खांद्यावर उचललं. त्याला पंडित नेहरूंकडे घेऊन गेले.
पंडित नेहरू यांनी त्याचं कौतुक केलं, त्या तरूणाची पाठ थोपटली. त्या तरूणाला पंडित नेहरूंनी अधिवेशनात बोलावलं तुझं अभिनंदन करू, सत्कार करू. त्यावेळी पंडित नेहरूंना काही लोकांनी सांगितलं की त्याला बोलवू नका तो शाखेत जातो. जळगावातल्या फैजपूरमध्ये राहणारे किसनसिंग राजपूत नावाचे ते स्वयंसेवक होते. पाच-सहा वर्षांपूर्वी वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं. डॉ. हेडगेवार यांना जेव्हा ही बाब कळली तेव्हा ते स्वतः जळगावला गेले त्यांनी राजपूत यांना चांदीची छोटीशी लोटी भेट म्हणून दिली.
पहिल्यांदा तिरंगा फडकवला गेला तेव्हापासून स्वयंसेवक तिरंग्याशी जोडला गेला आहे. त्यावेळी तर तिरंग्यावर चरखा होता अशोकचक्रही नव्हतं. पहिल्यांदा म्हणजेच १९३१ मध्ये काँग्रेसने संपूर्ण स्वातंत्र्याचा प्रस्ताव मंजूर केला तेव्हा डॉ. हेडगेवार यांनी संघाला संचलन काढण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी स्वयंसेवकांच्या हाती तिरंगाच होता. त्याद्वारे अभिनंदन प्रस्ताव हा काँग्रेसला पाठवला गेला अशीही आठवण मोहन भागवत यांनी सांगितली. तसंच संघाला तिरंग्याचा तिरस्कार नाही हेदेखील स्पष्ट केलं.
ADVERTISEMENT