श्रद्धाच्या हत्येविरोधात हिंदू एकता मंचाच्या कार्यक्रमात राडा, महिलेने एकाला चपलेने बडवलं

मुंबई तक

29 Nov 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 09:02 AM)

श्रद्धा वालकरच्या हत्येच्या घटनेमुळे अवघा देश हादरला. तिचा प्रियकर आफताबने तिची हत्या केली आणि त्यानंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले. या घटनेने अवघा देश हादरला. अशा हिंदू एकता मंचाने मंगळवारी महापंचायतीचं आयोजन केलं होतं. यावेळी या कार्यक्रमात राडा झाल्याचं पाहण्यास मिळालं. यावेळी एका महिलेने एका व्यक्तीला चपलेने हाणलं. नेमका काय होता कार्यक्रम? हिंदू एकता मंचाने […]

Mumbaitak
follow google news

श्रद्धा वालकरच्या हत्येच्या घटनेमुळे अवघा देश हादरला. तिचा प्रियकर आफताबने तिची हत्या केली आणि त्यानंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले. या घटनेने अवघा देश हादरला. अशा हिंदू एकता मंचाने मंगळवारी महापंचायतीचं आयोजन केलं होतं. यावेळी या कार्यक्रमात राडा झाल्याचं पाहण्यास मिळालं. यावेळी एका महिलेने एका व्यक्तीला चपलेने हाणलं.

हे वाचलं का?

नेमका काय होता कार्यक्रम?

हिंदू एकता मंचाने दिल्लीत कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी श्रद्धाला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी होत होती. तसंच यासाठी महापंचायत आयोजित करण्यात आली होती. श्रद्धाची हत्या ज्या भागात झाली त्याच ठिकाणी ही महापंचायत आयोजित करण्यात आली होती. बेटी बचाओ फाऊंडेशननेही या महापंचायतीला पाठिंबा दिला होता.

नेमकी घटना काय घडली?

याचवेळी या महापंचायतीच्या दरम्यान एक महिला तिची तक्रार घेऊन मंचावर गेली. त्यावेळी एका व्यक्तीने तिला धक्का दिला आणि माईककडून हटवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी या महिलेने या व्यक्तीला चपलेने हाणलं. त्यावेळी इतर लोक तिकडे आले आणि त्या व्यक्तीला वाचवलं.

आफताबने श्रद्धाची हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले. १८ मे रोजी ही घटना घडली होती. दिल्लीतल्या महारौली भागात असलेल्या एका फ्लॅटमध्ये ८ मे पासून लिव्ह इनमध्ये राहात होते. त्याआधी दोघंही मुंबईत राहात होते. १८ मे २०२२ ला या दोघांमध्ये भांडण झालं. त्यानंतर आफताबने श्रद्धाची हत्या केली. आफताबने श्रद्धाच्या मृत्यूनंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले. हे ३५ तुकडे त्याने त्याच्याच घरातल्या फ्रिजमध्ये ठेवले होते. महारौलीच्या जंगलात आफताब तिच्या मृतदेहाचे तुकडे फेकण्यासाठी जात होता. १२ नोव्हेंबरला पोलिसांनी आफताबला अटक केली. आफताबची नार्को चाचणी १ डिसेंबरला केली जाणार आहे.

श्रद्धा मर्डर केसमध्ये एक मोठा खुलासा झाला आहे. श्रद्धाला आफताबसोबत ब्रेकअप करायचं होतं. आफताबला ही बाब सहन झाली नाही त्यामुळेच त्याने तिची हत्या केली असं कळतं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रद्धा आफताबच्या वागणुकीला कंटाळली होती. तिला जवळपास रोज मारहाण केली जात होती. त्याच कारणामुळे तिला आफताबसोबत ब्रेक अप करायचं होतं. ३ आणि ४ मे रोजी श्रद्धाने आफताबला मला तुझ्यासोबत ब्रेक अप करायचं आहे असंही सांगितलं होतं. मात्र आफताबला हीच बाब सहन झाली नाही त्यामुळे तिने श्रद्धाची हत्या केली.

    follow whatsapp