Tanaji Sawant Son : सावंतांचा लेक कुठून उडाला कुठे लँड झाला? नाट्यमय घटनेचा घटनाक्रम 10 मुद्द्यांमध्ये

सोमवारी संध्याकाळी 5 वाजता सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नऱ्हे परिसरातून स्विफ्ट गाडीतून त्यांचे अपहरण झाले अशी प्राथमिक माहिती मिळाल्यानंतर सगळेच हादरले होते.

Mumbai Tak

मुंबई तक

11 Feb 2025 (अपडेटेड: 11 Feb 2025, 11:01 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

ऋषिराज सावंत यांचं अपहरण झालं होतं?

point

तानाजी सावंत यांनी रात्री नेमकं काय सांगितलं?

point

चार्टर्ड प्लेन कुठून परत बोलावलं?

तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत यांच्या मुलाच्या अपहरणाच्या बातमीनं काल खळबळ उडाली आहे. त्यानंतर रात्री उशिरा या संपूर्ण प्रकरणात स्पष्टता आली आणि ऋषिराज सावंत बँकॉक जाताना त्यांना परत बोलावण्यात आल्याचं समोर आलं. ऋषीराज सावंत याचे पुणे विमानतळावरून अपहरण करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नऱ्हे परिसरातून सायंकाळी 5 वाजता स्विफ्ट गाडीतून त्यांचे अपहरण झाले अशी प्राथमिक माहिती मिळाल्यानंतर सगळेच हादरले होते. रात्री उशिरा तानाजी सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार मुलगा परत आल्याचं कळलं आहे. मात्र, अत्यंत नाट्यमयरित्या हा प्रकार घडला असून, यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. 

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Mahayuti : मंत्र्यांचे पीए आणि ओएसडींच्या नियुक्त्या रखडल्या, शिंदेंचे मंत्री महायुतीत नाराज?


1. साडेचारला ऋषिराज सावंत कोणालाही न सांगता घरातून बाहेर पडले 
2. तानाजी सावंत यांना माहिती नसल्याने ते अस्वस्थ झाले.
3. याबाबत सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली.
4. तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना फोन केले. पुणे पोलीस आयुक्तांना देखील त्यांनी फोन केला. पोलिसांनी वेगाने चक्र फिरवली. 
5. ऋषिराज सावंत यांचं अपहरण झाल्याचा निनावी फोन पोलिसांना आला.
6.ऋषिराज सावंत यांचं स्विफ्ट गाडीतून कोणीतरी अपहरण केल्याच्या बातम्या आल्या.
7. पोलिसांनी तपास केल्यानंतर प्रायव्हेट प्लेनने ते पुणे विमातळावरुन गेल्याचं समोर आलं. 
8. दोन मित्रांसोबत ते बँकॉकला गेले. पोलिसांनी यंत्रणा कामाला लावली. ATC च्या मदतीने सावंत यांच्या मुलाचं प्लेन अंदबार निकोबार बेटाच्या ठिकाणी असताना परत बोलावण्यात आलं.
9. रात्री ते चेन्नईला उतरवण्यात आलं, त्यानंतर ते रात्री उशीरा लोहगाव विमानतळावर आणण्यात आलं.
10. मला न सांगता गेल्याने अस्वस्थ झाल्याचं सावंत म्हणाले. रात्री उशीरा प्रेस घेऊन मुलगा परत आल्याचं सावंत आणि पोलिसांनी सांगितलं.

हे ही वाचा >> Mumbai Central Railway : लोकलमध्ये मोबाईलचा स्फोट, मोठा आवाज झाल्यानं हादरले प्रवासी

दरम्यान, ऋषिराज सावंत असे का गेले हे विचारपूस केल्यानंतर समोर येईल. तर आमच्यात कुठलाही वाद न झाल्याचं सावंत म्हणाले आहेत.मित्र बरोबर आहेत म्हणून किडनॅपिंग म्हणता येणार नाही असं सांगण्यात आलं आहे.


 

    follow whatsapp