कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करत असलेल्या जगाने २०२१ मध्ये लसीकरणाला सुरुवात केली. भारतासह सर्व महत्वाच्या देशात विविध कंपन्यांच्या लसी दिल्या जात आहेत. रशियन निर्मित स्पुटनिक लसीचा नवीन अवतार आता या लढाईत सहभागी होणार आहे. स्पुटनिक लाईट नावाने लसीचा नवा डोस कंपनीने बाजारात आणला आहे. या लसीचं वैशिष्ट्य म्हणजे इतर लसींप्रमाणे या लसीचे दोन डोस घ्यावे लागत नाहीत ही लस ८० टक्के काम करते असं कंपनीने जाहीर केलं आहे.
ADVERTISEMENT
कोरोनाविरुद्धच्या या लढाईत स्पुटनिक लाईटमुळे अधिक बळ मिळणार आहे असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे. आतापर्यंत ६४ देशांनी स्पुटनिक लाईटसाठी रजिस्ट्रेशन केलं आहे.
रशियाने या लसीच्या वापराला परवानगी दिली आहे. सध्या ज्या देशात कोरोनाची स्थिती गंभीर आहे अशा ठिकाणी या लसीचा वापर करता येऊ शकतो असं कंपनीने स्पष्ट केलंय. स्पुटनिक लाईट लसीचा एक डोस जवळपास ८० टक्के परिणामकारक ठरतो आहे. ५ डिसेंबर २०२० ते १५ एप्रिल २०२१ या काळात रशियात लसीकरणासाठीचा मोठा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. या काळात स्पुटनिक लाईट लसीचा डोस दिलेल्या लोकांची माहिती गोळा करुन हा निष्कर्ष काढण्यात आला आहे, अशी माहिती RDIF या संस्थेने दिली आहे.
नागपुरात कोरोना रूग्णाला Remdesivir ऐवजी दिलं Acidity चं इंजेक्शन, पाचजण अटकेत
रशियातील ७ हजार व्यक्तींना सध्या ही लस दिली जात असून युएई, घाना आणि अन्य देशांमध्येही या लसीचे डोस दिले जात असल्याचं RDIF ने म्हटलंय. या देशांतील लसीकरणाचे निष्कर्ष महिन्याअखेरीस येणार आहेत. त्यानंतर या लसीचा गूण किती आहे हे समोर येणार आहे.
आधी Registration मगच मिळणार लस, मुंबई महापालिकेचे आदेश
ADVERTISEMENT