युक्रेनमधल्या भारतीयांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी Bridge Of Hope, पियुष गोयल यांनी केलं कौतुक

मुंबई तक

• 11:42 AM • 03 Mar 2022

रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धाचा आजचा आठवा दिवस आहे. किव्ह या ठिकाणी रशियाने हल्ले केले आहेत. त्यामुळे युक्रेनमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. अशात युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सोडवण्यात येतं आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. इतकंच नाही तर ऑपरेशन गंगाही राबवलं जातं आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी एक खास कार्टून […]

Mumbaitak
follow google news

रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धाचा आजचा आठवा दिवस आहे. किव्ह या ठिकाणी रशियाने हल्ले केले आहेत. त्यामुळे युक्रेनमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. अशात युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सोडवण्यात येतं आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. इतकंच नाही तर ऑपरेशन गंगाही राबवलं जातं आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी एक खास कार्टून शेअर केलं आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुकही केलं आहे.

हे वाचलं का?

युक्रेनमध्ये युद्ध सुरू असताना जे भारतीय अडकून पडले आहेत त्यांच्यासाठी नरेंद्र मोदी हे Bridge OF Hope म्हणजेच आशेचा पूल आहे असं त्यांनी म्हटलं आहे. यासाठी त्यांनी एक कार्टून ट्विट केलं आहे. या कार्टूनमध्ये भारत आणि युक्रेन यांच्यातून वाहणारी एक नदी दाखवण्यात आली आहे. त्या नदीतमध्ये नरेंद्र मोदी एक हात भारताच्या सीमेवर आणि एक हात युक्रेनच्या सीमेवर ठेवून उभे आहेत. तिथे अडकलेले भारतीय नरेंद्र मोदींच्या खांद्यावरून भारतात येत आहेत या आशयाचं हे कार्टून आहे. याच चित्रात अमेरिका, चीन आणि पाकिस्तान हे देखील दाखवण्यात आलं आहे. त्यांचे नागरिक मदतीसाठी याचना करत आहेत पण त्यांना कुणीही वाचवायला आलेलं नाही. हे चित्र ट्विट करून पियुष गोयल यांनी ऑपरेशन गंगाचं कौतुक केलं आहे.

युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये मागील आठ दिवसांपासून युद्ध सुरु आहे. दोन्ही देशांमध्ये चर्चेच्या फेऱ्यांमधूनही तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या मदतीसाठी केंद्र सरकारने Operation Ganga सुरु केले आहे. त्याअंतर्गत युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणलं जातं आहे. एवढंच नाही तर युक्रेनमध्ये अडकलेल्या लोकांसाठी OpGanga helpline नावाचे ट्विटर अकाऊंट उघडण्यात आले आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांसंबंधित सर्व प्रश्न या ट्विटर अकाऊंटवर टाकल्यास उत्तर देण्यात येतात. यासाठी भारतीयांच्या सुटकेसाठी केंद्र सरकारने वेगाने प्रयत्न केले जात आहेत.

रशिया आणि युक्रेन यांच्यातल्या युद्धाचा आजचा आठवा दिवस आहे. संयुक्त राष्ट्र महासभेने युक्रेनमधून रशियाने सैन्य परत बोलवावं असा प्रस्ताव मंजूर केला आहे. आज दोन्ही देशांमध्ये चर्चेची दुसरी फेरी पार पडणार आहे. अशात रशियन सैन्याने युक्रेनची राजधानी किव्हला चारही बाजूने घेरलं आहे. रशियाकडून हल्ले सुरूच आहेत. युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाजवळ मिसाईल हल्ला करण्यात आला आहे.

रशियाचं सैन्य आता आता युरोपच्या सर्वात मोठ्या न्यूक्लिअर पॉवर प्लांटच्या दिशेने पुढे चाललं आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातल्या युद्धाचा आज आठवा दिवस आहे. युक्रेनवर करण्यात आलेल्या हल्ल्यात एक बांगलादेशी जहाजही सापडलं आहे. या ठिकाणी असलेल्या एका बांगलादेशी क्रू मेंबरचा मृत्यू झाला आहे. त्याचं नाव Banglar Samriddhu आहे असंही समजतं आहे.

    follow whatsapp