रशियाच्या हल्ल्यांमुळे युरोपातील सर्वात मोठ्या अणु ऊर्जा प्रकल्पाला आग; युक्रेननं दिला इशारा

मुंबई तक

• 04:11 AM • 04 Mar 2022

रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धाचा आज नववा दिवस आहे. दोन्ही देश चर्चा करत असले, तरीही संघर्ष थांबलेला नाही. दिवसेंदिवस युक्रेनमधील स्थिती बिकट होत चालली असून, रशियाकडून होत असलेल्या हल्ल्यांनी युक्रेनमध्ये प्रचंड विध्वंस होत आहे. याच दरम्यान, आता रशियाच्या हल्ल्यांमुळे युरोपातील सर्वात मोठ्या अणुभट्टीजवळ आग लागल्याची माहिती समोर आली आहे. युक्रेननं आगीची माहिती देतानाच स्फोट झाला, तर चर्नोबिलपेक्षा […]

Mumbaitak
follow google news

रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धाचा आज नववा दिवस आहे. दोन्ही देश चर्चा करत असले, तरीही संघर्ष थांबलेला नाही. दिवसेंदिवस युक्रेनमधील स्थिती बिकट होत चालली असून, रशियाकडून होत असलेल्या हल्ल्यांनी युक्रेनमध्ये प्रचंड विध्वंस होत आहे. याच दरम्यान, आता रशियाच्या हल्ल्यांमुळे युरोपातील सर्वात मोठ्या अणुभट्टीजवळ आग लागल्याची माहिती समोर आली आहे. युक्रेननं आगीची माहिती देतानाच स्फोट झाला, तर चर्नोबिलपेक्षा १० पट अधिक तीव्रतेचा असेल, अशी भीती व्यक्त केली आहे.

हे वाचलं का?

इनरडोहार शहरानजीक असलेल्या झोपोरिझिया येथे युरोपातील सर्वात मोठा अणु ऊर्जा प्रकल्प असून, रशियाच्या हल्ल्यांमुळे प्रकल्पा धोका निर्माण झाला आहे. रशियाकडून चारही बाजूंनी हल्ले केले जात आहे. त्यामुळे अणु ऊर्जा प्रकल्पात आग लागल्याची माहिती युक्रेनकडून देण्यात आली आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होल्दिमीर झेलेन्स्की यांच्या कार्यालयाचे प्रमुख सल्लागारांनी आग याबद्दलचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. त्यांचं ट्विट युक्रेनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानेही रिट्विट केलं आहे.

रशियाने भारताच्या विनंतीवरून सहा तास युद्ध थांबवलं?; सत्य नेमकं काय?

झापोरिझिया न्युक्लिअर पावर प्लांट आगीत सापडला आहे. संपूर्ण युरोपला आण्विक आपत्तीची पुनरावृत्ती होण्याचा धोका आहे. रशियाने गोळीबार थांबवायला हवा, असं हा व्हिडीओ ट्विट करताना सांगण्यात आलं आहे.

त्याचबरोबर युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनीही ट्विट करत मोठा विध्वंस होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे. दिमित्रो कुलेबा यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “झापोरिझिया अणुभट्टीच्या चारही बाजूंनी रशियन सैन्य गोळीबार करत आहेत. हा युरोपातील सर्वात मोठा न्युक्लिअर पावर प्लांट आहे. आगीचा भडका उडालेला असून, जर स्फोट झाला, तर चर्नोबिलच्या तुलनेत १० पट अधिक तीव्रतेचा असेल, रशियाने तत्काळ हल्ले थांबवावेत. अग्निशमन दलाचे जवानांना तिथे जाऊ द्या,’ असं कुलेबा यांनी म्हटलं आहे.

जागोजागी पडलेले मृतदेह अन् मृत्यूला चकवणारी माणसं; युक्रेनमधील मन थिजवून टाकणारी दृश्ये

या घटनेनंतर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी फोनवरून चर्चा केली. जॉन्सन यांनी ट्विट करून सांगितलं की, “झोपोरिझिया अणु ऊर्जा प्रकल्पातील चिंताजनक परिस्थितीबद्दल मी आताच राष्ट्राध्यक्षे व्होल्दिमीर झेलेन्स्की यांच्याशी बोललो आहे. रशियाने ताबडतोब अणु ऊर्जा प्रकल्पावरील हल्ले थांबवावेत आणि आपतकालीन सेवांना अखंडपणे प्रवेश करू द्यावा,” असं ब्रिटननच्या पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीही राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना फोन केला. व्हाईट हाऊसने दिलेल्या माहितीप्रमाणे बायडेन यांनी फोनवरून झोपोरिझिया अणु ऊर्जा प्रकल्पात लागलेल्या आगीनंतरच्या परिस्थितीबद्दलची माहिती घेतली. या भागातील हल्ले थांबवून, अग्निशमन दलाला प्रवेश देण्याच्या झेलेन्स्की यांच्या भूमिकेचं बायडेन यांनी समर्थन केलं आहे.

झेलेन्स्की यांच्याबरोबरच अमेरिकेच्या उर्जा विभागातील अणु ऊर्जा सुरक्षा विभागाचे सचिव आणि राष्ट्रीय अणु ऊर्जा प्रशासनाशी बायडेन यांनी चर्चा केली. झोपोरिझियातील अद्यावत परिस्थितीची माहिती घेऊन अध्यक्ष बायडेन यांना दिली जाणार असल्या व्हाईट हाऊसने म्हटलं आहे.

    follow whatsapp