जेलमधून सुटताच देशमुखांच्या तोंडी सचिन वाझेचं नाव, पहिली प्रतिक्रिया

मुंबई तक

28 Dec 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 08:31 AM)

NCP MLA Anil Deshmukh first Reaction: मुंबई: माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची तब्बल वर्षभरानंतर तुरुंगातून सुटका झाली. अनिल देशमुख आर्थर रोड जेलमधून (Arthur Road Jail) बाहेर येताच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेत्यांसह कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला. अनिल देशमुख यांनी बाहेर आल्यानंतर माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत आपल्यावर अन्याय झाला असल्याचं म्हणत दु:ख […]

Mumbaitak
follow google news

NCP MLA Anil Deshmukh first Reaction: मुंबई: माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची तब्बल वर्षभरानंतर तुरुंगातून सुटका झाली. अनिल देशमुख आर्थर रोड जेलमधून (Arthur Road Jail) बाहेर येताच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेत्यांसह कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला. अनिल देशमुख यांनी बाहेर आल्यानंतर माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत आपल्यावर अन्याय झाला असल्याचं म्हणत दु:ख व्यक्त केलं. मात्र, यासोबतच त्यांनी सचिन वाझे (Sachin Vaze) यांचंही नाव घेतलं. पाहा अनिल देशमुख नेमकं काय म्हणाले. (sachin vazes name in anil deshmukhs mouth as soon as he was released from jail read the first reaction)

हे वाचलं का?

तुरुंगातून बाहेर येताच अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले सचिन वाझे हा…

‘मला खोट्या आरोपात फसविण्यात आलेलं आहे. परमबीर सिंह यांनी माझ्यावर 100 कोटींचा आरोप लावला. पण त्याच परमबीर सिंहने न्यायमूर्ती चांदीवाल यांच्या कोर्टात जाऊन प्रतिज्ञापत्र दिलं की, मी जे अनिल देशमुखांवर आरोप केले 100 कोटींचे ते फक्त ऐकीव माहितीवर आहे. माझ्याकडेही त्याबद्दल काही पुरावा नाही.’

‘त्याच बरोबर हायकोर्टाच्या निर्णयामध्ये.. जे हायकोर्टाने निरीक्षण केलेलं आहे त्यामध्ये सुद्धा परमबीर सिंह यांच्या अतिशय जवळचा सचिन वाझे याने जे माझ्यावर आरोप केले होते त्याबद्दल हायकोर्टाच्या न्यायमूर्तींनी आपल्या जजमेंटमध्ये सांगितलं आहे की,सचिन वाझे याच्यावर अतिशय गंभीर स्वरुपाचे आरोप आहेत. अशा गंभीर स्वरुपाच्या आरोप असलेल्या आरोपीच्या साक्षीवर विश्वास ठेवता येणार नाही. आपल्याला कल्पना आहे की, सचिन वाझे याच्यावर आतापर्यंत दोन खुनाच्या गुन्ह्यात अटकेची कारवाई झाली आहे.’

Anil Deshmukh Case Chronology : अनिल देशमुख तुरुंगातून बाहेर येणार पण अडकले कसे होते?

‘आतापर्यंत तीन वेळा त्याला निलंबित करण्यात आलं होतं. एकदा त्याला 16 वर्षांसाठी निलंबित केलं होतं. एक मुंबईचे उद्योगपती त्यांच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याच्या प्रकरणात त्याच्यावर एनआयएने देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. सचिन वाझे याच्यावर असे गंभीर स्वरुपाचे आरोप आहेत. त्यामुळे त्याच्या साक्षीवर विश्वास ठेवता येणार नाही असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं आहे.’

‘माझ्यावर झालेल्या आरोपात काहीही तथ्य नाही. न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे. तसेच आमच्या संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसचा देखील न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. न्यायमूर्तींनी आम्हाला न्याय दिला त्यामुळे मी सर्वांचे आभार मानतो. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे सर्वोच्च नेते शरद पवार आणि आमचे वरिष्ठ सहकारी यांनी जो वेळोवेळी पाठिंबा दिला त्या सर्वांचे मी आभार मानतो. धन्यवाद..’

LIVE: अनिल देशमुखांचं नववर्ष तुरुंगाबाहेर, राष्ट्रवादीचा तुफान जल्लोष

‘सचिन वाझेंने सुद्धा जबाब दिला न्यायालयात शपथेवर आणि त्याने सांगितले की, मी जे आरोप केले आहेत त्या आरोपात काही तथ्य नाही. असं त्याने चांदीवाल आयोगासमोर सांगितलं आहे. विविध स्तरावर त्याने विविध जबाब दिले आहेत. त्यामुळे कोर्टाने सांगितलं की, सचिन वाझेने वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे जबाब दिल्याने त्याच्या साक्षीवर विश्वास ठेवता येणार नाही.’

‘मला अतिशय दु:ख आहे की, एका खोट्या गुन्ह्यामध्ये तोही एका गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमाने केलेल आरोपामुळे मला 14 महिने तुरुंगात राहावं लागलं याचं दु:ख आहे.’ अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी दिली आहे.

    follow whatsapp