अँटेलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन प्रकरणातील आरोपी आणि बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेने ईडीला पत्र लिहिलं आहे. यामध्ये सचिन वाझेने आपण माफीचा साक्षीदार व्हायला तयार आहोत असं म्हटलं आहे. अनिल देशमुख यांच्या मनी लाँड्रीग प्रकरणातही तो आरोपी आहे. आता आपल्याला माफीचा साक्षीदार करावं असं पत्र सचिन वाझेने ईडीला पाठवलं आहे. त्यामुळे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं आहेत.
ADVERTISEMENT
काय म्हटलं आहे सचिन वाझेने?
ईडीच्या सहाय्यक संचालकांना पाठवलेल्या पत्रात सचिन वाझेने म्हटले आहे की, “मी सक्षम न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर वरील प्रकरणाच्या संदर्भातील मला ज्ञात असलेल्या सर्व सत्य आणि ऐच्छिक माहिती देण्यास तयार आहे. त्यानुसार मला माफी देण्यासाठी या अर्जावर निर्णय घ्यावा ही विनंती करतो. मी तुम्हाला विनंती करतो की, सीआरपीसीच्या कलम 306, 307 अंतर्गत मला माफी देण्याच्या या अर्जावर कृपया विचार करावा.” सीआरपीसीचे कलम 306 आणि 3007 गुन्ह्यात साथीदाराला क्षमा देण्याच्या न्यायालयाच्या अधिकारांशी संबंधित आहेत.
अनिल देशमुख-सचिन वाझे कनेक्शनबद्दल ईडीच्या आरोपपत्रात काय म्हटलंय?
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त यांनी दोन गंभीर आरोप केले होते. त्यातला पहिला आरोप होता तो म्हणजे अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला दर महिन्याला मुंबईतील बार आणि रेस्तराँमधून 100 कोटींची खंडणी वसूल करण्याचं टार्गेट दिलं होतं. तर दुसरा आरोप होता की अनिल देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्या यात ढवळाढवळ करत होते. यासंदर्भात ईडीने अनिल देशमुख यांना अटक केली आहे. ईडीला दिलेल्या जबाबात अनिल देशमुख यांनी असंही सांगितलं होतं की मी जे बदल्यांमध्ये लक्ष घालत होतो त्याची यादी परिवहन मंत्री अनिल परब हे मला देत होते. त्यांच्या सांगण्यानुसारच मी वागत होतो. आता सचिन वाझेने मनी लाँड्रींग प्रकरणात माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा देशमुख यांच्या अडचणी वाढू शकतात अशीच चिन्हं आहेत.
राज्यातील पोलीस बदल्यांची यादी अनिल परब मला देत होते, अनिल देशमुख यांचा गौप्यस्फोट
असीताराम कुंटे काय म्हणाले होते?
राज्यातील पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या संदर्भात लॉबिंग आणि भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाला होता. या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी ईडीला दिलेल्या जबाबात एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.
पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीत गैरव्यवहार होत असल्याचा आरोप होत होता. या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीतील गैरव्यवहार झाल्याच्या संदर्भात तत्कालीन एसआयडी प्रमुख रश्मी शुक्ला यांनी जुलै 2020 मध्ये एक अहवाल तयार केला होता. त्या प्रकरणाचा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे हा अहवाल दिला होता. या अहवालानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 28 सप्टेंबर रोजी डीजीपी सुबोध जैसवाल यांना एक पत्र पाठवले. मात्र, मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या या पत्रावर डीजीपी सुबोध जैसवाल यांनी उत्तरच दिलं नाही असा जबाब सीताराम कुंटे यांनी ईडीला दिलेल्या जबाबात म्हटलं आहे.
ADVERTISEMENT