सलमान-कतरिना ‘टायगर-3’च्या शुटिंगमध्ये; टर्कीतील फोटो आले समोर

मुंबई तक

• 11:36 AM • 04 Sep 2021

अभिनेता सलमान खान आणि कतरिना कैफने आगामी चित्रपट टायगर-3 चे शुटिंग सुरू केलं आहे. दोघेही सध्या टर्कीमध्ये असून, टर्कीच्या पर्यटन मंत्र्यांसोबतचे फोटो समोर आले आहे. सलमान खान कतरिना कैफने टर्कीचे पर्यटन मंत्री मेहमत नुरी र इरसॉय (Mehmet Nuri Ersoy)यांची भेट घेतली. सलमान-कतरिना भेटीचे फोटो पर्यटनमंत्र्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ‘बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खान व […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

अभिनेता सलमान खान आणि कतरिना कैफने आगामी चित्रपट टायगर-3 चे शुटिंग सुरू केलं आहे. दोघेही सध्या टर्कीमध्ये असून, टर्कीच्या पर्यटन मंत्र्यांसोबतचे फोटो समोर आले आहे.

सलमान खान कतरिना कैफने टर्कीचे पर्यटन मंत्री मेहमत नुरी र इरसॉय (Mehmet Nuri Ersoy)यांची भेट घेतली.

सलमान-कतरिना भेटीचे फोटो पर्यटनमंत्र्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

‘बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खान व कतरिना कैफ आपल्या नवीन प्रोजेक्टसाठी आमच्या देशात आले आहेत. टर्की आंतरराष्ट्रीय सिनेमांच्या प्रोजेक्टचं आदरातिथ्य करत राहिल’, असं त्यांनी फोटो शेअर करताना म्हटलं आहे.

फोटोमध्ये सलमान खानने ब्लॅक सूट घातलेला आहे. तर कतरिनाने बदामी रंगाचा टॉप व ब्लॅक पँट परिधान केलेली दिसत आहे. दोघांनीही टर्कीच्या पर्यटन मंत्रालयातील अधिकाऱ्यांची भेट घेतली.

    follow whatsapp