बॉलिवूडमध्ये सध्या अभिनेता सलमान खानच्या राधे या सिनेमाची जोरदार चर्चा सुरु आहे. सलमानचे चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहतायत. ईदच्या दिवशी हा सिनेमा रिलीज करण्यात येणार असल्याची घोषणा खुद्द सलमान खानने केली होती. मात्र आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या सिनेमाचीही रिलीज डेट पुढे ढकलण्यात येण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
एका न्यूज पोर्टलला दिलेल्या इंटरव्यूमध्ये सलमानच्या म्हणण्याप्रमाणे, राधे सिनेमा याच वर्षी ईदच्या दिवशी रिलीज करण्याची त्याची इच्छा आहे. मात्र जर लॉकडाऊन लागला आणि कोरोना रूग्णांची संख्या अशी वाढत राहिली तर त्याला हा सिनेमा पुढीच्या वर्षीच्या ईदला रिलीज करावा लागेल.
सलमानच्या राधे सिनेमात अजय आणि शाहरूखचंही आकर्षण
सलमान म्हणाला, “आम्ही राधे सिनेमा रिलीज करणार होतो. यासाठी आम्ही हवी तशी तयारी देखील केली होती. मात्र कोरोनाची परिस्थिती अशीच राहिली कर सिनेमाचं प्रदर्शन पुढे ढकलावं लागेल. आता कमी व्हाव्यात, लोकांनी स्वतःची काळजी घ्यावी, मास्क वापरावं आणि मी आशा करतो की लवकरच सर्वकाही सुरळीत व्हावं.”
कोरोनामुळे अमिताभ यांच्या आगामी सिनेमाची रिलीज डेट ढकलली पुढे!
कोरोनाच्या रूग्णांचा आकडा पुन्हा एकदा वाढताना दिसतोय. यामुळे राज्यात नाट्यगृह आणि थिएटर्स बंद करण्यात आली आहे. तर कोरोनाच्या या संकटाचा परिणाम बॉलिवूड सिनेमांवरही झालेला पहायला मिळतोय. काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन स्टारर असलेल्या चेहरे सिनेमाची रिलीज डेट पुन्हा पुढे ढकलण्यात आली. अभिनेता इम्रान हाश्मी याने सोशल मीडियावरून याची माहिती दिली होती.
ADVERTISEMENT