OBC Reservation: ‘संभाजी महाराजांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातील आरक्षण देण्याचा प्रयत्न करू नये, नाहीतर…’

मुंबई तक

• 10:56 AM • 02 Jul 2021

धनंजय साबळे, अकोला ‘संभाजी महाराज (Sambhaji Raje) यांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातील आरक्षण (OBC Reservation) देण्याचा प्रयत्न करू नये. तो आम्ही कदापि सहन करणार नाही. जर राज्य सरकारने तसं केलं तर समाज रस्त्यावर उतरेल आणि मग संघर्ष अटळ आहे.’ अशी प्रतिक्रिया ओबीसी नेते व माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे यांनी अकोल्यात पत्रकार परिषदेत केली आहे. […]

Mumbaitak
follow google news

धनंजय साबळे, अकोला

हे वाचलं का?

‘संभाजी महाराज (Sambhaji Raje) यांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातील आरक्षण (OBC Reservation) देण्याचा प्रयत्न करू नये. तो आम्ही कदापि सहन करणार नाही. जर राज्य सरकारने तसं केलं तर समाज रस्त्यावर उतरेल आणि मग संघर्ष अटळ आहे.’ अशी प्रतिक्रिया ओबीसी नेते व माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे यांनी अकोल्यात पत्रकार परिषदेत केली आहे.

‘तर रस्त्यावर उतरु, संघर्ष अटळ आहे’

‘छत्रपती संभाजी महाराज यांनी मराठा समाजाला 342 (A) मध्ये आरक्षण (Maratha Reservation) मागितलं आहे. हे कलम जे आहे ते फक्त एखाद्या समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करायचा असेल तर त्यासाठी आहे. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करा अशी संभाजीराजे यांची अशी मागणी आहे का? त्यामुळे ओबीसी समाज हा संभ्रमावस्थेत आहे. त्यामुळे त्यांन भूमिका स्पष्ट करावी.’ असं प्रकाश अण्णा शेंडगे म्हणाले.

‘संभाजीराजे यांचे वडील म्हणतायेत की, आम्हाला ओबीसीमध्ये जायचं नाही. आम्हाला 50 टक्क्यांच्या वरचं आरक्षण पाहिजे. त्यासाठी आम्ही घटना दुरुस्तीद्वारे केंद्राचं आरक्षण घेऊ. पण संभाजीराजे म्हणतात की, आम्ही 338 (B) आणि 342 (A) ची प्रक्रिया सुरु करावी. याचाच अर्थ असा आहे की, संभाजीराजेंनी मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे.’ असा दावा शेंडगे यांनी दिला आहे.

‘पण तो जो प्रयत्न आहे तो आम्ही कदापि होऊ देणार नाही. तसं काही राज्य सरकारने केलं तर मात्र, आम्ही टोकाचा संघर्ष करु.’ असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार ओबीसीचे स्थानिक स्वराज्य संस्थांनमधील राजकीय आरक्षण स्थगित करण्यात आलं आहे. राज्य शासनाने या निकालाचा पुनर्विचार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती मात्र ती याचिका फेटाळण्यात आलीय.

यामुळे राज्य निवडणूक आयोगाने वाशिम, अकोला, नागपूर, धुळे व नंदुरबार या पाचही जिल्ह्यातील ओबीसीच्या आरक्षित जागा खुल्या प्रवर्गातून भरण्याबाबत आदेश काढून पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

मात्र या निवडणुकांबाबत ओबीसी जनमोर्चाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकार तसेच विरोधी पक्ष हे दोन्ही अपयशी ठरले आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष हे एकाच माळेतील मणी असल्याची टीका ओबीसी जनमोर्चाचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश शेंडगे यांनी केली आहे. ते अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

Maratha Reservation: केंद्राची पुनर्विचार याचिका फेटाळल्यानंतर आता संभाजीराजेंनी सांगितला अखेरचा पर्याय

सरकार भाजपचं असो की आघाडीचे ओबीसी समाजाला आरक्षण दोघांच्या कार्यकाळात मिळालं नसल्याने सर्वपक्ष एकच अशी टीकाही शेंडगे यांनी केली आहे.

    follow whatsapp