संभाजीराजेंनी अपक्ष लढावं ही देवेंद्र फडणवीस यांची खेळी होती असा दावा शाहू छत्रपती यांनी पत्रकारांसोबत बोलताना केला आहे. राज्यसभेच्या जागांसाठी होणाऱ्या होणाऱ्या निवडणुकीमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. माजी खासदार संभाजीराजे यांना निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहणार अशी भूमिका घेतली.
ADVERTISEMENT
त्यानंतर त्यांनी विधानसभेच्या सर्व सदस्यांना पत्र पाठवून मदत करण्याचं आवाहन केलं. मात्र कुठल्याच पक्षाने ठोस भूमिका घेतली नाही त्यामुळे संभाजीराजेंनी निवडणुकीतून माघार घेतली. आता त्यानंतर त्यांनी अपक्ष लढावं ही फडणवीस यांचीच खेळी होती असं छत्रपती शाहूंनी म्हटलं आहे.
काय म्हणाले शाहू महाराज?
छत्रपती घराण्याचा या सगळ्यात अपमान वगैरे झाला असा काही प्रश्न येत नाही हे राजकारण आहे. माझ्यापर्यंत काही विषय आला असता तर गोष्ट वेगळी होती. मात्र तसं काही झालं नाही. संभाजीराजेंना उमेदवारी नाकारली याच्याशी घराण्याचा संबंध आला नाही. त्यांना व्यक्तिगत उमेदवारी नाकारली. संभाजीराजेंना माघार घ्यावी लागणं हा छत्रपतींच्या घराण्याचा अपमान आहे अशी चर्चा रंगू लागली होती त्याला आज शाहू महाराजांनी हे उत्तर दिलं आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संभाजीराजेंनी भेट घेतली. त्यानंतर एक-ते दोन दिवसातच आपण अपक्ष लढू असं जाहीर केलं. देवेंद्र फडणवीस आणि संभाजीराजे यांच्यात काय चर्चा झाली ते मला माहित नाही. मात्र अर्धा तास चर्चा झाली याचा अर्थ काहीतरी विषय झाला असेलच. महाविकास आघाडीसोबत गेलात तर तुम्हाला पाठिंबा कसा देता येईल? त्यापेक्षा तुम्ही अपक्ष लढा आम्ही पाठिंबा देतो असं संभाजीराजेंना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं असेल त्यामुळे ही त्यांचीच खेळी होती असं म्हणता येईल असंही शाहू महाराजांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजे छत्रपतींना दिलेला शब्द फिरवला?; संजय राऊतांनी केला खुलासा
बहुजन मतांमध्ये विभाजन व्हावं यासाठी भाजपने ही खेळी जाणीवपूर्वक केली असावी असाही दावा शाहू महाराजांनी केला. जानेवारी महिन्यापासून संभाजीराजेंनी खासदारकीसाठी प्रयत्न सुरू केले होते. मात्र एक खऱं आहे की त्यांनी जशी पाठिंबा हवा म्हणून देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली तशीच महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांमधल्या नेत्यांचीही भेट घ्यायला हवी होती असंही शाहू महाराज यांनी म्हटलं आहे.
काय आहे प्रकरण?
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडी पुरस्कृत लढण्याबाबत संभाजीराजे ठाम होते. मात्र ही जागा शिवसेनेकडे असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजेंना राज्यसभा निवडणूक शिवसेनेकडून लढा, पक्षात या असं म्हणत ऑफर दिली होती. मात्र ही ऑफर संभाजीराजेंनी नाकारली. अपक्ष लढण्यावर ते ठाम राहिले. मात्र पाठिंबा मिळाला नाही हे म्हटल्यावर त्यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतली.
ADVERTISEMENT