समीर वानखेडेंनी धर्मपरिवर्तन केलं? राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे उपाध्यक्ष म्हणतात…

मुंबई तक

• 03:18 PM • 30 Oct 2021

राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर खोटं जात प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप करत मोठी खळबळ उडवून दिली. नवाब मलिकांच्या आरोपामुळे ड्रग्ज पार्टी प्रकरणाला वेगळचं वळण मिळालं. समीर वानखेडे यांना तुरुंगात टाकणार असल्याचं आव्हान नवाब मलिकांनी दिल्यानंतर समीर वानखेडेंनीही स्वतःहून राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. राष्ट्रीय मागासवर्ग […]

Mumbaitak
follow google news

राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर खोटं जात प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप करत मोठी खळबळ उडवून दिली. नवाब मलिकांच्या आरोपामुळे ड्रग्ज पार्टी प्रकरणाला वेगळचं वळण मिळालं. समीर वानखेडे यांना तुरुंगात टाकणार असल्याचं आव्हान नवाब मलिकांनी दिल्यानंतर समीर वानखेडेंनीही स्वतःहून राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.

हे वाचलं का?

राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर हे मुंबईत असताना समीर वानखेडेंनी त्यांची भेट घेत आपला तक्रार अर्ज दिला. या दोघांमध्येही तब्बल तासभर चर्चा झाली. वानखेडे यांनी जात प्रमाणपत्रांसह आपलं निवेदन हलदर यांना सादर केलं. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत असताना हलदर यांनी प्राथमिक चौकशीनंतर धर्मांतर केलं नसल्याचं सांगितलंय.

एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची कागदपत्रे मी तपासली आहेत. वानखेडे यांनी धर्मांतर केलं नाही असं सकृतदर्शनी दिसून येतं, असं राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांनी स्पष्ट केलंय.

काही लोक कुटुंबावर जातीवरून अटॅक करत आहेत. त्यामुळे वानखेडे यांनी आमच्याकडे तक्रार केली आहे. तुम्ही शेड्यूल कास्टचे आहात का? असं मी वानखेडेंना विचारलं. त्यांनी हो म्हणून सांगितलं. तसेच काही पुरावेही सादर केले, असंही हलदर यांनी सांगितलं.

“त्यांच्याशी बोलताना समीर वानखेडे शेड्यूल कास्टच्या महार जातीचे असल्याचं वाटत आहे. त्यांचा विवाह स्पेशल मॅरेज अॅक्टनुसार झाला होता. त्यांचे रेकॉर्डही मी तपासले. त्यांनी धर्मांतर केलेलं नाही”, असं हलदर म्हणाले.

NCB ने Aryan Khan ची केस गरजेपेक्षा जास्त खेचली – वकील मुकुल रोहतगी यांचा दावा

वानखेडे हे शिक्षित आहेत. ते कायदा जाणतात. त्यांच्याकडे कागदपत्रे आहेत, असं सांगतानाच आमच्याकडे त्यांच्या जातीबाबत कोणी तक्रार केल्यास आम्ही त्याची चौकशी करू. पण कोणताही निर्णय एकतर्फी होणार नाही, असंही हलदर यांनी सांगितलं. याप्रकरणात महाराष्ट्र सरकार काय करतं ते पाहू. त्यानंतर राष्ट्रीय मागासवर्ग आयोग आपलं काम करेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Cruise Drugs Case : अटक झालेल्या २० आरोपींची आताची स्थिती काय आहे? जाणून घ्या…

    follow whatsapp