आर्यन खान प्रकरणामुळे वादात सापडलेल्या समीर वानखेडेंची चेन्नईत ‘नॉन सेंसिटिव्ह’ पदावर बदली

दिव्येश सिंह

• 07:07 AM • 31 May 2022

मुंबई एनसीबीचे माजी प्रादेशिक अधिकारी समीर वानखेडे यांची मुंबईतून चेन्नई येथे बदली करण्यात आली आहे. एनसीबीने बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला क्लिन चिट दिल्यानंतर वानखेडेंची बदली करण्यात आलीये. यापूर्वी त्यांची एनसीबीतून उचलबांगडी करण्यात आली होती. कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरण आणि आर्यन खान अटक यावरून मुंबई एनसीबीचे तत्कालिन झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर गंभीर […]

Mumbaitak
follow google news

मुंबई एनसीबीचे माजी प्रादेशिक अधिकारी समीर वानखेडे यांची मुंबईतून चेन्नई येथे बदली करण्यात आली आहे. एनसीबीने बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला क्लिन चिट दिल्यानंतर वानखेडेंची बदली करण्यात आलीये. यापूर्वी त्यांची एनसीबीतून उचलबांगडी करण्यात आली होती.

हे वाचलं का?

कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरण आणि आर्यन खान अटक यावरून मुंबई एनसीबीचे तत्कालिन झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप झाले होते. एनसीबीच्या या कारवाईवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर अमली पदार्थ नियंत्रण विभागातून समीर वानखेडेंची बदली करण्यात आली होती.

… तर आर्यन खान निर्दोष असल्याचंच सिद्ध होतं; गृहमंत्री वळसे-पाटील यांचं मोठं विधान

सोमवारी सायंकाळी आयआरएस सेवेतील अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले. यात समीर वानखेडे यांचाही समावेश असून, त्यांची मुंबईतून चेन्नईला बदली करण्यात आली आहे.

समीर वानखेडे यांची आता महसूल गुप्तचर संचालनालयात करदाता सेवा संचालनालयाचे महासंचालक (DG Taxpayer Service Directorate) म्हणून ‘नॉन सेंसिटिव्ह’ पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

NCB :समीर वानखेडे अडकणार?; आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात क्लिन चिट मिळताच केंद्राने दिले निर्देश

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात समीर वानखेडेंकडून चुका

काही दिवसांपूर्वी एनसीबीने एनपीडीएस न्यायालयात क्रूझ ड्रग्ज प्रकरणी आरोपपत्र दाखल केलं. या आरोपपत्रात आर्यन खान याच्यासह सहा जणांच्या नावांचा समावेश नव्हता. आर्यन खानसह सहा जणांविरुद्ध पुरेसे पुरावे नसल्याचं एनसीबीच्या एसआयटीने म्हटलेलं आहे.

एनसीबीकडूनच आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात क्लिन चिट देण्यात आल्यानं एकूण कारवाईवर प्रश्न चिन्ह उपस्थित होतं आहे. एनसीबीचे महासंचालक एस. एन. प्रधान यांनी या प्रकरणावर बोलताना एनसीबीकडून या प्रकरणाच्या तपासात चुका झाल्याचं म्हटलं होतं.

या प्रकरणाची केंद्र सरकारनेही दखल घेतली होती. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश केंद्रीय गृह मंत्रालयाने संबंधित विभागाला दिले होते. त्यानंतर आता समीर वानखेडेंची बदली करण्यात आली आहेत.

समीर वानखेडे यांची जात पडताळणी नेमकी कुठे झाली?; वाशिम-अकोल्यातही नोंद नाही

एनसीबीचे महासंचालक काय म्हणाले होते?

आर्यन खानला क्लिन चिट मिळाल्यानंतर एनसीबीचे संचालक एस. एन. प्रधान यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणात भूमिका स्पष्ट केली होती. ‘आर्यन खान प्रकरणातील तपासात समीर वानखेडे आणि त्यांच्या पथकाकडून चूक झाली आहे.’

आर्यन खान प्रकरणाच्या तपासात झालेली चूक आणि प्रक्रियेचं पालन न केल्याचा ठपका ठेवत समीर वानखेडेंची बदली करण्यात आली असल्याचं बोललं जात आहे.

    follow whatsapp