समीर वानखेडे जन्माने मुस्लिमच आहेत. बोगस दाखला दाखवून समीर वानखेडे यांनी नोकरी मिळवले. मी माझ्या दाव्यावर ठाम आहे की ते जन्माने मुस्लिम आहेत असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. 2015 पासून या लोकांनी त्यांची ओळख लपवण्यास सुरूवात केली. फेसबुक पेजवर दाऊद वानखेडे असंच नाव होतं. नंतर ज्ञानदेव लिहिण्यास सुरूवात केली आहे. एवढंच नाही तर समीर वानखेडे यांचे नातेवाईकच मुस्लिम आहेत असाही दावा नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
नवाब मलिक यांनी मीडियाशी बोलताना हा दावा केला की समीर वानखेडेंचा मेव्हणा आहे. तो आता व्हेनिसला राहतो. तो त्यांचा नातेवाईक आहे. तो मुस्लिम आहे. काल राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांनी मीडियाशी संवाद साधताना एक विधान केलं. वानखेडेंनी धर्मांतर केलं नाही असं ते म्हणाले. मी पुन्हा सांगतो वानखेडे जन्माने मुस्लिम आहेत. त्यांचे कुटुंब मुस्लिम होते, असं मलिक म्हणाले.
वानखेडेंनी बोगस दाखल्यावर नोकरी मिळवली आहे. वानखेडे कुटुंबाने 2015पासून आपली ओळख लपवली. फेसबूकवर दाऊद वानखेडे असं नाव होतं. त्यांनी ते बदलून डिके वानखेडे लिहिलं. नंतर ज्ञानदेव लिहिलं. मुस्लिम लोकांसमोर विषय गेला तर नोकरी धोक्यात येईल म्हणून नाव बदललं. यास्मिनचं जास्मीन केलं. दाऊदचा ज्ञानदेव झाला. जावई, सून सोबत राहिले तर अडचणीचं होऊ शकतं म्हणून त्यांनी घटस्फोट घेतला. मेव्हण्यालाही घटस्फोट दिला, असं त्यांनी सांगितलं.
नवाब मलिक यांनी क्रूझ ड्रग्ज प्रकरणात गंभीर आरोप केलेला काशिफ खान कोण आहे?
अरुण हलदर हे भाजपचे नेते आहेत. आता ते मागासवर्ग आयोगाचे उपाध्यक्ष आहेत. संवैधानिक पदावर नेमणूक झाल्यावर काही पथ्य पाळायचे असतात. तक्रार मिळाल्यावर त्यांनी आधी त्या तक्रारीची चौकशी केली पाहिजे. तथ्य आणि सत्य शोधून काढलं पाहिजे. नंतर अहवाल करून संसदेत ठेवला पाहिजे. थेट कोणी आला आणि कोणी सांगितलं. तर थेट मीडियासमोर बोलणं म्हणजे दाल में कुछ काला है. जबाबदार पदावरील व्यक्ती असं विधान करतो. संवैधानिक पदाची काही कार्यपद्धती असते. कागदपत्रं मिळाल्यानंतर चौकशी केली पाहिजे. जो व्यक्ती मागासवर्गीय नाही आणि मागासवर्गीयांचे अधिकार हिरावून घेतो, त्याची हलदर बाजू घेत आहेत. हे योग्य नाही, असं ते म्हणाले.
माजी मुख्यमंत्र्यावरही आरोप
नीरज गुंडे हा मागील सरकारचा दलाल आहे, हा दलाल माझ्यावर आरोप करतोय. ज्याच्या चेंबूरच्या घरी माजी मुख्यमंत्री जाऊन बसायचे. ज्याला मुख्यमंत्र्यांच्या केबिनमध्ये थेट जायला मिळायचं. सगळ्या विभागाच्या सेक्रेटरींच्या ऑफिसमध्ये याचं जाणं येणं होतं. वर्षावर हा कायम फिरत असायचा. रश्मी शुक्लाच्या प्रकरणात देखील गोंधळ घालत होता. महापालिकेत वारंवार जात होता. हाच दलाल आता समीर वानखेडे यांच्या कार्यालयात जाऊन तासनतास बसत असतो. हा तिथं का बसत असतो? त्याच्या मागे एक कारण आहे.
कारण काशिफ खान, मोहित कंबोज, कॉर्डियला क्रूझ याचा एकमेकांशी संबंध आहे. ही बाब मी लवकरच समोर आणणार आहे. त्यानंतर भाजपच्या लोकांना राज्यभरात तोंडं दाखवायची लायकी उरणार नाही. आशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी रविवारी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नीरज गुंडे यांना फटकारलं.
ADVERTISEMENT