राज्यात सध्या लसीकरणाचा तुटवडा जाणवतोय. राज्य सरकारने केंद्र सरकारकडे लसींची मागणी केली आहे. यामध्ये काही अभिनेत्यांनी सरसकट लसीकरण सुरु करावी अशी मागणी केलीये. तर मराठी अभिनेता संदीप पाठक याने लसीकरणावरून राजकारण करून नका असं म्हटलंय.
ADVERTISEMENT
sandipsa
यासंदर्भात संदीपने ट्विट केलंय. तो त्याच्या ट्विटमध्ये म्हणतो, “देशात सगळ्यात जास्त महाराष्ट्रात कोरोनाचे रूग्ण वाढत असताना इतर राज्यांना लस पुरवठा मोठ्या प्रमाणात का? पक्ष, राजकारण ह्यांच्या वादात सामान्य माणूस कोरोनाग्रस्त होतोय.आपण माणसाच्या जीवाशी खेळतोय ह्याचं भान सर्व राजकीय पक्षांनी असू द्यावं.”
दरम्यान संदीपचं हे ट्विट सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं आहे. अनेकांनी संदीपने अगदी योग्य मुद्दा मांडला असल्याचं म्हटलंय. संदीपचं मत अगदी योग्य असल्याचं म्हणत अनेकांनी त्याचं कौतुक केलंय.
ADVERTISEMENT