सध्या देशभरासह राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येतो आहे. या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने ब्रेक द चेनच्या माध्यमातून अनेक नव्या निर्बंधांची घोषणा केली आहे. ज्यात आंतरजिल्हा प्रवास करण्यासाठी नागरिकांना आपण कोरोना निगेटीव्ह असल्याचा रिपोर्ट दाखवावा लागतो. परंतू काही ठिकाणी या नियमांमधून पळवाट शोधण्यासाठी रुग्णालयातले कर्मचारी आघाडीवर असल्याचं पहायला मिळत आहे. प्रवासासाठी १ हजार रुपयात कोरोना निगेटीव्ह सर्टिफिकीट बनवून देणाऱ्या एका इसमाला सांगली पोलिसांनी अटक केली आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, सिनर्जी हॉस्पिटलध्ये टेक्निशियन पदावर काम करणारा स्वप्नील बनसोडे हा युवक नागरिकांना स्वॅब टेस्ट न करता आधार कार्डाच्या जोरावर १ हजार रुपयात कोरोना निगेटीव्ह असल्याचं सर्टिफिकीट देत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सांगली पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती मिळताच त्यांनी स्वप्नील बनसोडेविरोधात सापळा रचला.
सांगली : महापालिका क्षेत्रात सात दिवसांचा जनता कर्फ्यू
बनावट ग्राहक तयार करुन सांगली पोलिसांनी स्वप्नील बनसोडेला आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पास घेण्याकरता कोरोना निगेटीव्ह असल्याचा रिपोर्ट हवा असल्याचं सांगितलं. यानंतर स्वप्नीलने आधार कार्डाची मागणी करताच पोलिसांनी एका मृत व्यक्तीचं आधारकार्ड दिल्यानंतर त्या आधारकार्डाच्याद्वारे कोविड निगेटीव्ह रिपोर्ट करुन देत असताना पोलिसांनी स्वप्नील बनसोडे या आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली आहे.
कोरोनाग्रस्त रुग्णाच्या नातेवाईकांकडून खंडणी, पिंपरीतील ३ डॉक्टर अटकेत
ADVERTISEMENT