सांगली: पुरोगामी महाराष्ट्रात नेमकं काय सुरु?, आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांवर सामाजिक बहिष्कार

मुंबई तक

• 08:39 AM • 16 Jan 2022

स्वाती चिखलीकर, सांगली: आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याची घटना सांगलीत घडली होती. आता याच प्रकरणी नंदिवाले समाजातील जातपंचांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंनिसच्या प्रयत्नामुळे सांगली जिल्ह्यातील पलूस पोलीस स्टेशन येथे सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्यांतर्गत हा गुन्हा दाखल झाला आहे. नंदिवाले समाजातील काही जातपंचांनी पलूस तालुक्यातील सांडगेवाडी येथे जातपंचायत 9 जानेवारी 2022 रोजी […]

Mumbaitak
follow google news

स्वाती चिखलीकर, सांगली: आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याची घटना सांगलीत घडली होती. आता याच प्रकरणी नंदिवाले समाजातील जातपंचांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंनिसच्या प्रयत्नामुळे सांगली जिल्ह्यातील पलूस पोलीस स्टेशन येथे सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्यांतर्गत हा गुन्हा दाखल झाला आहे.

हे वाचलं का?

नंदिवाले समाजातील काही जातपंचांनी पलूस तालुक्यातील सांडगेवाडी येथे जातपंचायत 9 जानेवारी 2022 रोजी बसविली होती. या जातपंचायतमध्ये त्यांनी कराड येथे जातपंचायतींनी घेतलेला निर्णय अमान्य करून या आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांवरील सामाजिक बहिष्कार सुरू ठेवणार असल्याचे जाहीर केले होते.

पलूस येथील झालेला हा जातपंचायतीचा निर्णय ‘सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्या’नुसार गुन्हा आहे. म्हणून इस्लामपूर येथील आंतरजातीय विवाह केलेले प्रकाश शंकर भोसले यांनी या कायद्यानुसार पलूस पोलीस स्टेशनला 14 जानेवारी 2022 रोजी गुन्हा दाखल केला.

यामध्ये जातपंचायतीचे पंच विलास भिंगार्डे, चंद्रकांत पवार, शामराव देशमुख, अशोक भोसले, किसन रामा इंगवले आणि विलास मोकाशी या पंचांवर सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्यानुसार पलूस पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद झाला आहे.

सदर गुन्हा नोंद करताना आंतरजातीय विवाह केलेले काही पीडित तरुण उपस्थित होते. त्यामुळे हे प्रकरण किती गंभीर आहे याची आपल्याला कल्पना येऊ शकते.

महाराष्ट्रातील नंदिवाले काशी कापडी या समाजातील काही तरुणांनी आंतरजातीय विवाह केले आहेत. अशा अंदाजे 150 जोडप्यांना नंदिवाले जातपंचांनी समाजातून बहिष्कृत केले आहे. त्यांना समाजातील कोणत्याही सुखदु:खाच्या कार्यक्रमात बोलावले जात नाही किंवा कोणीही त्यांच्याशी संबंध ठेवत नाहीत.

अशा आंतरजातीय विवाह केलेल्या तीस जोडप्यांनी एकत्रपणे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा सातारा यांच्याकडे तक्रार अर्ज दिला होता. तेव्हा पंचांनी सामाजिक बहिष्कार मागे घेत असल्याचे कबूल केले होते. त्यानुसार पंचांची पुढील बैठक 26 डिसेंबर 2021 रोजी कराड येथे होऊन या बैठकीतही राज्यातील आंतरजातीय विवाह केलेल्या कुटुंबांवरील सामाजिक बहिष्कार मागे घेत असल्याचे जाहीर केले होते.

जात पंचायतीचा बहिष्कार, मुलींनी दिला वडिलांच्या पार्थिवाला खांदा

मात्र, पलूस तालुक्यातील नंदीवाले पंचांनी हा निर्णय अमान्य करून या आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांवरील सामाजिक बहिष्कार सुरू ठेवणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

    follow whatsapp