पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी माझी व माझ्या समाजाची बदनामी-संजय राठोड

मुंबई तक

• 08:33 AM • 23 Feb 2021

पूजा चव्हाण या बंजारा समाजाच्या मुलीचा पुण्यात मृत्यू झाला. ही अत्यंत दुर्दैवी घटना होती. मी आणि संपूर्ण बंजारा समाज हा त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहे. विरोधकांनी, भाजपने या प्रकरणाचं घाणेरडं राजकारण केलं. जाणीवपूर्वक या प्रकरणी माझी आणि माझ्या समाजाची प्रतिमा मलीन करण्यात आला. मी गायब झालो नव्हतो, कुठेही कामं थांबवलं नाही. गेल्या पंधरा दिवसांपासून माझी सगळी कामं […]

Mumbaitak
follow google news

पूजा चव्हाण या बंजारा समाजाच्या मुलीचा पुण्यात मृत्यू झाला. ही अत्यंत दुर्दैवी घटना होती. मी आणि संपूर्ण बंजारा समाज हा त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहे. विरोधकांनी, भाजपने या प्रकरणाचं घाणेरडं राजकारण केलं. जाणीवपूर्वक या प्रकरणी माझी आणि माझ्या समाजाची प्रतिमा मलीन करण्यात आला. मी गायब झालो नव्हतो, कुठेही कामं थांबवलं नाही. गेल्या पंधरा दिवसांपासून माझी सगळी कामं सुरू होतील. पूजा चव्हाण प्रकरणात पोलीस तपास करत आहेत त्यामधलं सत्य बाहेर येईल. माझा पोलिसांवर विश्वास आहे असंही संजय राठोड यांनी सांगितलं. पोहरादेवी या ठिकाणी संजय राठोड दाखल झाले होते. त्यावेळी त्यांनी पंधरा दिवसांनी हे स्पष्टीकरण दिलं. अकारण माझी, माझ्या समाजाची बदनामी करू नका ती थांबवा असंही आवाहन मी करतो आहे असंही संजय राठोड यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

पाहा पूजा चव्हाण प्रकरणातला मुंबई तक चा खास व्हीडिओ

पूजा चव्हाण प्रकरणात काय म्हणाले संजय राठोड?

पूजा चव्हाण या तरूणीचा मृत्यू ही दुर्दैवी बाब आहे. मात्र या मृत्यू प्रकरणावरून भाजपकडून घाणेरडं राजकारण सुरू आहे. माझं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न होतो आहे. पूजा चव्हाणसोबतचे माझे फोटो व्हायरल केले जात आहेत. मात्र सामाजिक जीवनात अनेक माणसं भेटत असतात त्यांच्यासोबत फोटो असणं हे काही विशेष नाही. या प्रकरणावरून माझी, माझ्या कुटुंबीयांची आणि माझ्या बंजारा समाजाची बदनामी करू नका. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. पोलीस चौकशीत सत्य बाहेर येईल.

काय आहे प्रकरण?

पूजा चव्हाण या टिकटॉक स्टारने आत्महत्या केली. त्यानंतर उलटसुलट चर्चाही सुरू झाल्या. पूजा चव्हाण या तरूणीने पुण्यातल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. या घटनेत ती जखमी झाली. त्यानंतर तिला रूग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर दोन दिवसांनीच १२ ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या. या क्लिप्समधला आवाज हा संजय राठोड यांचा आहे असा आरोप भाजपने करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू केली. या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रतिक्रिया विचारली असता प्रकरणाची चौकशी सुरू असून या प्रकरणात जे सत्य समोर येईल त्यानंतर कारवाई होईल असं स्पष्ट केलं. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बारा क्लिप्स ऐकाव्यात म्हणजे त्यांना सत्य समजेल असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

आज काय घडलं?

पूजा चव्हाण आत्महत्येच्या प्रकरणानंतर ज्यांच्यावर आरोप झाले होते ते संजय राठोड आज पंधरा दिवसांनी पोहरादेवी या ठिकाणी गेले होते. या ठिकाणी त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. त्यांच्यासोबत हजारो समर्थक या ठिकाणी हजर होते. या समर्थकांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमारही करावा लागला. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत असताना पूजा चव्हाण प्रकरणात माझी अकारण बदनामी करण्यात आल्याचं संजय राठोड यांनी म्हटलं आहे. तसंच माझी आणि माझ्या समाजाची बदनामी करू नका असंही आवाहन त्यांनी केलं आहे.

    follow whatsapp