‘…आणि मग मी दाखवतो’, संतापलेल्या संजय राऊतांचं नारायण राणेंना चॅलेंज

मुंबई तक

06 Jan 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:26 AM)

‘संजय राऊतांना सोडणार नाही. त्यांच्यावर केस टाकणार असून, पुन्हा तुरुंगात जाण्याचा रस्ता मोकळा करत आहे,’ धमकीवजा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी दिला. राणेंच्या याच विधानावरून संजय राऊतांचा पारा चढलेला दिसला. भडकलेल्या राऊतांनी याच विधानावरून राणेंविरोधात दंड थोपटलेत. झालं असं की, एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले, “नारायण राणेंवर बोललं की, ब्रेकिंग न्यूज होते. माझ्याकडे […]

Mumbaitak
follow google news

‘संजय राऊतांना सोडणार नाही. त्यांच्यावर केस टाकणार असून, पुन्हा तुरुंगात जाण्याचा रस्ता मोकळा करत आहे,’ धमकीवजा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी दिला. राणेंच्या याच विधानावरून संजय राऊतांचा पारा चढलेला दिसला. भडकलेल्या राऊतांनी याच विधानावरून राणेंविरोधात दंड थोपटलेत.

हे वाचलं का?

झालं असं की, एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले, “नारायण राणेंवर बोललं की, ब्रेकिंग न्यूज होते. माझ्याकडे कात्रणं आहेत. मी वाचून विसरणारा नसून दखल घेणारा आहे. माझा वाईट स्वभाव आहे. 26 डिसेंबरचा अग्रलेख मी राखून ठेवला आहे. संजय राऊत यांना सोडणार नाही. मी सुद्धा त्यांच्यावर केस टाकणार आहे. 100 दिवस आत राहिले, आता त्यांना वाटतं परत आत जावं. मी रस्ता मोकळा करत आहे परत जाण्यासाठी”, असं म्हणत राणेंनी राऊतांना पुन्हा तुरुगांत पाठवण्याची भाषा केली.

नारायण राणेंनी केलेल्या या विधानावरून खासदार संजय राऊत भडकले. मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांना याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राऊत म्हणाले, “शंभर टक्के, त्यांनी केला पाहिजे. त्यांच्यासारखे आम्ही ठरपोक आणि पळपुटे नाही. ईडीची नोटीस येताच पक्ष बदलणारे आम्ही नाही.”

‘उद्या दिल्लीत झेप घ्यायचीच, तेव्हा…’, योगींना सामनातून टोले अन् टोमणे

राजवस्त्र बाजूला काढा आणि मग या…; राऊतांचं राणेंना आव्हान

“कोण-कुणाशी हिंमतीच्या गोष्टी बोलतंय? धाडसाच्या गोष्टी बोलतंय? त्यांनी बोलाव्यात. मी अजूनपर्यंत त्यांच्यावर काहीही बोललेलो नाही. एकेकाळी ते आमचे सहकारी होते. धमक्या देऊ नका. धमक्या देणार असाल, तर राजवस्त्र बाजूला काढा आणि या. मग दाखवतो मी”, असं म्हणत राऊतांनी राणेंविरुद्ध दंड थोपटले.

“माझ्या नादाला लागू नका. झाकली मूठ सव्वा लाखाची. मी परत सांगतोय, ते काय मला जेलमध्ये… मी हिमतीने गेलोय पक्षासाठी. तुमच्यासारखा पळून नाही गेलो ईडीने बोलवल्यावर. आम्ही शरणागती पत्करली नाही. आम्ही नामर्द नाहीये. आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत”, असं प्रत्युत्तर राऊतांनी राणेंना दिलंय.

Yuvasena : प्रस्थापित नेत्यांच्या मुलांना आदित्य ठाकरेंचा दणका

तुरुगांत पाठवण्याची विधानं करणाऱ्या नेत्यांची संजय राऊत सरन्यायाधीशांकडे करणार तक्रार

“मला जेलमध्ये घालताहेत ना… घाला मला. तुमच्या हातात न्यायालय आणि कायदा आहे का? तुम्ही कायद्याचे बाप झाला आहात का? या सगळ्यांची नोंद आहे. कोण कोण मला जेलमध्ये टाकू म्हणतंय… कोण-कोण मला काय म्हणतंय, ते सगळं मी सरन्यायाधीशांना पाठणार. प्रत्येकाचं वक्तव्य मी सरन्यायाधीशांना पाठवणार आहे. नारायण राणेंची जर सगळी आर्थिक प्रकरणं काढली ना, तर पन्नास वर्ष सुटणार नाहीत ते”, असा गर्भित इशारा संजय राऊतांनी राणेंसह शिंदे गट आणि भाजपच्या नेत्यांनाही दिलाय.

    follow whatsapp