प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्म ठिकाणाबद्दल केलेल्या विधानावरून विरोधकांनी भाजपला घेरलं आहे. या विधानावरुन संजय राऊतांनी भाजपला उपरोधिक टोले लगावताना शिंदेंवरही निशाणा साधला. संजय राऊत म्हणाले, ‘मला असं वाटतंय की अफजल खान आणि औरंगजेब यांच्या कानात सांगतो आणि त्यानुसार हे बोलतात.’
ADVERTISEMENT
खासदार संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांना भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केलेल्या विधानाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राऊत म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांची शक्तीच यांना खतम करणार आहे. शिवाजी महाराजांची जी भवानी तलवार आहे ना… ती तलवारच यांचं मुंडकं छाटणार आहे. यांच्या पक्षाचं मुंडकं छाटणार. रोज कुणीतरी उठतो आणि शिवाजी महाराजांवर भाष्य करतो. मला असं वाटायला लागलंय की, यांच्या स्वप्नात अफजल खान आणि औरंगजेब येतोय. यांच्या कानात काहीतरी सांगतो आणि त्यानुसार हे बोलतात.”
“शिवाजी महाराजांवर अशा प्रकारे बोलण्याची यांची लायकी आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? त्यांचं महानिर्वाण कुठे झालं? हे अख्ख्या जगाला, देशाला माहितीये. रायगडावर त्यांची समाधी आहे. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यात झालाय. त्यात नवीन काय आहे?”, असा उपरोधिक टोला संजय राऊत यांनी लगावला.
‘छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला’, प्रसाद लाडांच्या विधानाने वादाला खतपाणी!
“तुम्ही नवीन नवीन शोध लावताहेत. भारतीय जनता पक्षाने इतिहास संशोधन मंडळाची नव्याने स्थापना केलीये का? जसं मुख्यमंत्र्यांनी नवीन निती आयोग स्थापन करून आपल्या बिल्डर मित्राची वर्णी लावली. त्याप्रमाणे भाजपने नवीन इतिहास संशोधन मंडळ निर्माण करून तिथे असे लाड द्वाड लोक यांची नेमणूक केलीये का? हे महाराष्ट्राचा नवीन इतिहास लिहिणार आहेत का? कशा प्रकारे सरकार चालवलं जातंय?”, असे सवाल उपस्थित करत संजय राऊतांनी भाजपबरोबरच शिंदेंवरही टीकेचे बाण डागलेत.
Prasad Lad: ‘राजकीय गांजाडयांना मराठी माणूस सेना भवनाच्या फुटपाथवर बेदम चोपतील,’ राऊतांची प्रसाद लाडांवर बोचरी टीका
छत्रपती शिवाजी महाराज जन्म ठिकाण वाद : प्रसाद लाड यांनी मागितली माफी
प्रसाद लाड यांनी केलेल्या विधानाचे पडसाद राज्यात उमटले. त्यानंतर प्रसाद लाड यांनी खुलासा केला. “छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस ज्यापद्धतीने राजकारण करण्याचा प्रयत्न करतेय. त्याचा मी निषेध करतो. ज्या भावनेतून जो कार्यक्रम आम्ही केलाय, स्वराज्य कोकणभूमी त्यामध्ये मी स्पष्टपणे म्हटलं होतं आणि माझी चुक देखील मी सुधरली होती”, असं लाड यांनी म्हटलं आहे.
Uddhav Thackeray : भाजप किती तोंडाचा नाग आहे? छत्रपती शिवरायांचा अपमान कसा खपवून घेता?
“व्हिडीओत पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी, स्वराज्याची स्थापनाही कोकणातून झाली आणि जन्म शिवनेरीवर झाला, असं माझ्या बाजूला बसलेल्या संजय यादवरांवांनी देखील म्हटलं. ते देखील मीडियामध्ये आलेलं आहे. परंतु तरीदेखील छत्रपतींचं नाव घेऊन राजकारण करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस सातत्यानं करतं. त्याचा मी निषेध करतो. माझ्या शब्दामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी दिलगिरी व्यक्त करतो”, असा खुलासा प्रसाद लाड यांनी केला आहे.
ADVERTISEMENT