नागपूर: ‘खासदार संजय राऊत हे शरद पवारांचे प्रवक्ते झालेले आहेत. ते शिवसेनेचे खासदार किंवा प्रवक्ते राहिलेले नाहीत.’ अशी टीका महाविकास आघाडी सरकारमधील महत्त्वाचे नेते आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
ADVERTISEMENT
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना खासदार संजय राऊत हे सातत्याने म्हणत आहेत की, ‘यूपीएचं नेतृत्व हे शरद पवारांकडे सोपवलं गेलं पाहिजे.’ त्यांच्या याच वक्तव्याचा समाचार नाना पटोले यांनी आपल्या पद्धतीने घेतला आहे. ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.
पाहा नाना पटोले नेमकं काय म्हणाले:
‘खासदार संजय राऊत हे शरद पवारांचे प्रवक्ते झालेले आहेत. ते शिवसेनेचे खासदार किंवा प्रवक्ते राहिलेले नाहीत. कारण ते सातत्याने अशा प्रकारचं वक्तव्य करत आहेत. कारण शिवसेना ही यूपीएची सदस्य नाही. जर शिवसेना यूपीएची सदस्य नाही तर त्या पद्धतीचं वक्तव्य करण्याचा अधिकार त्यांना नाही. असं आमचं मत आहे. पण अजूनही संजय राऊत त्या पद्धतीचं बोलतात.’
‘आता त्यांच्या बद्दलचं फार काही बोलावं असं वाटत नाही. पण मुख्यमंत्र्यांसोबत एकदा माझं समोरासमोर बोलणं झाल्यानंतर या गोष्टीची आम्ही स्पष्टता करु. आमच्या नेत्यांच्या बद्दल कुठल्याही व्यक्तीने या पद्धतीने वक्तव्य करणं हे आम्हाला मान्य नाही. त्याबाबतची भूमिका आम्ही स्पष्टपणे मांडणार आहोत.’ असं म्हणत नाना पटोलेंनी संजय राऊतांवर एक प्रकारे निशाणाच साधला आहे.
‘यूपीएचा कॅप्टन बदला हे सोळावा गडी म्हणतोय’, फडणवीसांचा संजय राऊतांना टोमणा
पाहा संजय राऊतांनी यांची नेमकी मागणी आहे तरी काय?
‘जर देशात विरोधी पक्ष मजबूत करायचा असेल तर यूपीएचं नेतृत्व हे शरद पवार यांच्यासारख्या नेत्याकडे सोपवलं गेलं पाहिजे. ज्यांना देशभरात मान्यता आहे. दरम्यान, देशात असे अनेक पक्ष आहेत की जे यूपीएमध्ये देखील नाहीत आणि एनडीएमध्ये देखील नाहीत. अशांना यूपीएमध्ये आणण्याचा प्रयत्न झाला पाहिजे.’ अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे.
दरम्यान, याआधीही संजय राऊत यांनी शरद पवार यांना यूपीएचं अध्यक्ष बनविण्यात यावं अशी मागणी केली होती. सध्या सोनिया गांधी या यूपीएच्या अध्यक्षा आहेत. सध्या शिवसेना यूपीएमध्ये नाही. पण महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसन यांचं महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आहे.
यावेळी संजय राऊत असंही म्हणाले की, ‘महाराष्ट्रात जो प्रयोग झाला आहे तो प्रयोग खूपच यशस्वी ठरला आहे. आज संपूर्ण देश आमच्याकडे पाहतो आहे. आम्ही सातत्याने हेच सांगितलं आहे की, यूपीएची पुर्नबांधणी झाली पाहिजे.’
सुप्रिया सुळेंची काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींशी चर्चा, पाहा राजधानी दिल्लीत नेमकं काय सुरुयं!
‘यूपीएचा कॅप्टन बदला हे सोळावा गडी म्हणतोय’, फडणवीसांचा संजय राऊतांना टोमणा
‘UPAचा कॅप्टन बदला हे सोळवा गडी म्हणतोय’, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील दोनच दिवसांपूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांना टोमणा लगावला होता.
‘यूपीएचा कॅप्टन बदला हे सोळावा गडी म्हणतोय. सोळाव्या गडीच्या म्हणण्याने कोण कॅप्टन होणार हे ठरत नसतं. त्याकरता टीममध्ये असावं लागतं. टीमच्या बाहेरच्या माणसाने ते म्हणून काही फायदा नसतो.’ असं म्हणत फडणवीसांनी संजय राऊत यांच्या मागणीची खिल्ली उडवली होती.
ADVERTISEMENT