परमबीर सिंग यांच्या तडकाफडकी बदलीनंतर संजय राऊत यांची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई तक

• 12:53 PM • 17 Mar 2021

खाकी वर्दीचा मान आणि शान यापुढील काळात अधिक हिमतीने व सचोटीने राखला जाईल, असं ट्विट करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या बदलीवर प्रतिक्रिया दिलीये. आज परमबीर सिंग यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरुन तडकाफडकी बदली करण्यात आली. तर त्यांच्या जागेवर हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई तसेच महाराष्ट्र पोलीस […]

Mumbaitak
follow google news

खाकी वर्दीचा मान आणि शान यापुढील काळात अधिक हिमतीने व सचोटीने राखला जाईल, असं ट्विट करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या बदलीवर प्रतिक्रिया दिलीये. आज परमबीर सिंग यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरुन तडकाफडकी बदली करण्यात आली. तर त्यांच्या जागेवर हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

संजय राऊत यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. संजय राऊत लिहितात, “मुंबई तसंच महाराष्ट्र पोलीस दलास नवे नेतृत्व मिळालं आहे. आपल्या पोलीस दलाची परंपरा महान आहे. एखाद्या वावटळीत पोलीस दलाची पडझड होईल या भ्रमात कोणीच राहू नये. खाकी वर्दीचा मान व शान यापुढील काळात अधिक हिमतीने व सचोटीने राखला जाईल हीच अपेक्षा.”

मोठी बातमी: मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली, सचिन वाझे प्रकरण भोवलं

अँटेलिया संशयित कार, मनसुख हिरेन हत्या आणि सचिन वाझे अटक हे संपूर्ण प्रकरण मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना भोवलं असल्याचं म्हटलं जातंय. गेल्या काही दिवसांपासून परमबीर सिंग हे सचिन वाझे प्रकरणामुळे चर्चेत होते. अखेर आज त्यांची बदली गृहरक्षक दलामध्ये करण्यात आली. या सर्व प्रकरणावर संजय राऊत यांनी ट्विट करत विरोधकांना सूचक इशाराही दिलाय.

अँटेलिया, वाझेंना अटक ते मुंबई आयुक्तांची बदली
पाहा आतापर्यंत काय-काय घडलं?

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मंगळवारी रात्री उशीरापर्यंत वर्षा बंगल्यावर चर्चा सुरु होती. त्यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, हेमंत नागराळे आणि परमवीर सिंग हे उपस्थित होते. तब्बल चार तास ही बैठक सुरु होती. यानंतर आज सकाळी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात देखील सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर आता मुंबई पोलीस आयुक्तांची बदली करण्याचा निर्णय जाहीर केला.

    follow whatsapp