शिवसेना भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांचा पार चांगलाच चढल्याचं दिसलं. भाजपकडून सरकार पाडण्यासाठी देण्यात आलेल्या धमक्यांचा उल्लेख करत ईडीकडून करण्यात आलेल्या कारवायांबद्दल अनेक गौप्यस्फोट करत संजय राऊत यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर नाव न घेता हल्ला चढवला.
ADVERTISEMENT
मुंबईतील शिवसेना भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी टीकास्त्र डागलं. पत्रकार परिषदेला राऊत यांच्यासह शिवसेनेचेे नेतेे, उपनेते, खासदार आणि आमदार उपस्थित होते.
‘मला असं वाटतंय की आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषद आहे. या भवनाने अनेक हल्ले पचवले आहेत. मुख्यमंत्र्यांना इथूनच नमस्कार करतो. ते वर्षा बंगल्यावरून पत्रकार परिषद बघत होते. उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. त्या सगळ्यांनी लढाई सुरू करा असंच सांगितलं. महाराष्ट्राविरुद्ध मराठी माणसाविरुद्धच्या आक्रमणाविरुद्ध रणशिंग फुंकण्याची गरज होती. आज ते शिवसेना भवनातू फुंकत आहोत”, असं राऊत म्हणाले.
“तुम्ही काही पाप केलं नसेल, तर कुणाच्या बापालाही घाबरू नका, असं शिवसेनाप्रमुख आम्हाला सांगून गेलेत. त्यासाठीच पत्रकार परिषद घेत आहोत. महाराष्ट्र XXX औलांद नाही हा संदेश द्यायचा आहे. मराठी माणून बेईमान नाही. तुम्ही कितीही पाठिमागून वार केले, तरी शिवसेना घाबरणार नाही”, असं आव्हान राऊत यांनी दिलं.
“शरण व्हा, गुडघे टेका नाहीतर सरकार आम्ही घालवू, अशा धमक्या आम्हाला दिल्या जात आहेत. भाजपचे नेते तारखा का देत आहेत. 170 आमदारांचं संख्याबळ असताना भाजपचे नेते तारखा का देत आहेत? उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना दिलेल्या पत्रापासून याची सुरुवात झाली आहे,” असंही राऊत म्हणाले.
“पत्र देण्याच्या २० दिवस आधी भाजपचे प्रमुख नेते तीन वेळा मला भेटले. या सरकारच्या प्रवाहातून बाहेर पडा असं त्यांनी (भाजप नेते) मला वारंवार सांगितलं. सरकार घालवण्याची तयारी झाली आहे. राष्ट्रपती राजवट आणू, आमदार फोडून आम्ही हे सरकार बनवू. तुम्ही मध्ये पडू नका. तुम्ही आम्हाला मदत करा, असे ते म्हणाले”, असा गौप्यस्फोट राऊतांनी केेला.
“त्यावर मी म्हटलं कसं शक्य आहे. १७० आमदारांचं बहुमत कसं पायदळी तुडवू शकता. त्यावर ते (भाजप नेते) मला म्हणाले की, ‘केंद्रीय तपास यंत्रणा टाईट करतील आणि फिक्स करतील, असं भाजपचे नेते मला म्हणाले होते.”
“त्यांनी मला असंही सांगितलं की, सध्या पवार कुटुंबावर धाडी पडत आहेत. आम्ही त्यांनाही टाईट करत आहोत, असं भाजपचे नेते मला म्हणाले, ‘ईडीचे लोकं पवारांच्या घरात त्यांच्या बहिणींच्या आणि मुलींच्या घरात जाऊन बसले आहेत. त्यांनी (भाजप नेते) मला असंही सांगितलं की, केंद्रीय बळ आणून सगळ्यांना थंड करू.’ त्यानंतर तिसऱ्या दिवशीपासून माझ्यावर आणि माझ्या जवळच्या लोकांवर ईडीच्या धाडी सुरू झाल्या”, असा दावा राऊत यांनी केला.
“या धाडी पडण्याआधी मुलूंडचा दलाल पत्रकार घेऊन सांगतो की, संजय राऊतांना अटक होणार आहे. आता ईडीचे लोक त्यांच्या घरी पोहोचणार आहे. या व्यक्तीच्या घरी पोहोचणार आहे. हा काय प्रकार आहे. तुमचं सरकार आलं नाही, म्हणून आम्हाला त्रास देता. बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला गुडघे टेकवायला शिकवलं नाही,” असं राऊत म्हणाले.
“किरीट सोमय्या उद्धव ठाकरे यांचे १९ बंगले असल्याचा आरोप करतात. आपण सगळे जण एक दिवस त्या बंगल्यात पिकनिक काढू. जर ते बंगले तुम्हाला दिसले, तर मी राजकारण सोडेन. जर नसतील, तर मुलुंडच्या त्या दलालाला जोड्याने मारू,” असा इशारा राऊत यांनी सोमय्यांना दिला. दररोज भपंकपणा सुरू आहे. लोकांच्या मनात भ्रम निर्माण करायचं काम सुरू आहे, असं राऊत म्हणाले.
ADVERTISEMENT